भरती प्रक्रियेत अफरातफर, MPSC च्या अध्यक्षाची गाढवावरुन धिंड काढू, भाजप नेत्याचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला (MPSC Recruitment Process) आहे.

भरती प्रक्रियेत अफरातफर, MPSC च्या अध्यक्षाची गाढवावरुन धिंड काढू, भाजप नेत्याचा इशारा
Follow us
| Updated on: Feb 29, 2020 | 7:43 PM

सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission -MPSC) भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला (MPSC Recruitment Process) आहे. जर पुन्हा अशी अफरातफर झाली तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची गाढवावर बसून धिंड काढू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात राज्य सरकार PSI च्या 605 जागा भरणार असल्याचे नमूद केलं आहे. त्यानुसार NT प्रवर्गासाठी साडेतीन टक्क्याने 22 जागा असणं गरजेचं आहे. पण त्यात फक्त 2 जागा NT प्रवर्गासाठी दिल्या आहे. त्यामुळे उरलेल्या 20 जागा कुठे गेल्या? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे चोरी झालेल्या 20 जागा द्या, अशीही मागणी पडळकरांनी केली (MPSC Recruitment Process) आहे.

2010 ते 2019 पर्यंत NT च्या 293 जागा भरायच्या होत्या. त्यापैकी 200 चं जागा भरल्या. उरलेल्या 93 जागा चोरीला गेल्या आहेत, असेही पडळकर म्हणाले.

याबाबत सरकारने सुधारित जाहिरात काढा, त्यानंतरच परीक्षा घ्या. जर सुधारित जाहिरात काढली नाही तर आम्ही महाराष्ट्रात परीक्षा होऊ देणार नाही अशी भूमिकाही पडळकरांनी घेतली आहे.

जर भरती प्रक्रियेत जागेच्या बाबत अफरातफर करत असतील, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची हकालपट्टी करावी अशी मागणीही गोपीचंद पडळकरांनी राज्यपालांना केली आहे.

तसेच पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाने भरती प्रक्रियेत अफरातफर केली, तर तो व्यक्ती अध्यक्ष पदावर राहण्याच्या लायकीचा नाही असे समजून त्याची गाढवावर बसून धिंड काढू असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला (MPSC Recruitment Process) आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.