आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ

आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की यांचे (भाजपचे) डोळे पांढरे होतील". (Hasan Mushrif on Maharashtra package)

आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच मोठं पॅकेज जाहीर करेल. (Hasan Mushrif on Maharashtra package) हे पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील”, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करावं, या आणि अन्य मागण्यांसाठी भाजपने माझं अंगण, माझं रणांगण, महाराष्ट्र वाचवा हे आंदोलन सुरु केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीवरुन हसन मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

हसन मुश्रीफ म्हणाले, ” केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? सगळं कर्जच आहे. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा नाही. आमचं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की यांचे (भाजपचे) डोळे पांढरे होतील”. (Hasan Mushrif on Maharashtra package)

“महाविकास आघाडी सरकार कसं अडचणीत येईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. जीएसटीचे 12 हजार कोटीची थकबाकी द्यायची होती. आज मी आकडा घेतला साडेपाच हजार कोटीची थकबाकी यायची आहे. चालू तर सोडूनच द्या. पीएम केअरमधून किती पैसे दिले? मुंबईतून सर्व पैसे पीएम केअरला गेले आणि 400 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. उत्तर प्रदेशला 1500 कोटी रुपये दिले. हा कुठला न्याय?” असा सवाल मुश्रीफ यांनी विचारला.

“केंद्राने 20 लाख कोटी जाहीर केलं मात्र हे कसलं पॅकेज आहे? 3 लाख कोटी कर्ज म्हणे MSEB ला. बँका दारात उभ्या करत नाहीत, त्यांना कर्ज कोणी देत नाही. पेंडिंग आणि लेंडिंग यामध्ये खूप मोठा फरक आहे. याचा लोकांना काहीही फायदा होत नाही. आपलं महाराष्ट्र सरकार बारा बलुतेदार आणि श्रमिकांना असं मोठं पॅकेज देईल की डोळे पांढरे होतील”. असा विश्वास हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

फडणवीसांची मागणी

शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशा प्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं. केंद्राने जीडीपीच्या 5 टक्के कर्ज घेण्याची परवानगी राज्याला दिली आहे, केंद्राच्या गॅरंटीवर महाराष्ट्राला एक लाख 60 हजार कोटी रुपये मिळू शकतात, असं गणित विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं होतं. केंद्राने 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंय, असं फडणवीस म्हणाले होते.

वाचा : गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या, फडणवीसांची मागणी, 1 लाख 60 हजार कोटीचं गणित मांडलं

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजचं विश्लेषण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग पाच पत्रकार परिषदा घेत केलं होतं. या पॅकेजची  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन  यांनी सलग पाच दिवस पत्रकार परिषद घेत माहिती दिली. सीतारमन यांनी आरोग्य, शिक्षण, व्यापार, मनरेगा, कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरी योजना, संरक्षण, उपग्रह यासह बहुतेक सर्व क्षेत्राला मदत जाहीर केली होती.

Corona Special Report | 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून कोणाला काय?

मोदींकडून 20 लाख कोटी पॅकेजची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी देशाला संबोधित करुन ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा दिला. (PM Narendra Modi self reliance India) कोरोनामुळे जग संकटात आहे, मात्र या संकटासमोर शरण पत्करेल तो मानव कसला. 21 वं शतक भारताचं आहे. कोरोनाच्या या संकटाचं रुपांतर संधीत करुन भारताला स्वावलंबी बनवू असं पंतप्रधान मोदी म्हणाले.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत अभियान पॅकेज जाहीर करुन 20 लाख कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं.

Hasan Mushrif on Maharashtra package

संबंंधित बातम्या 

Nirmala Sitharaman | आरोग्य, शिक्षण, मनरेगासाठी विशेष तरतुदी, 20 लाख कोटींचे पॅकेज नेमकं कसं?

self reliance India : पराभव मंजूर नाही, स्वावलंबी भारतासाठी 20 लाख कोटीचं पॅकेज : मोदी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *