लॉकडाऊन संपेपर्यंत भाजप आमदाराचा अन्नत्याग, कोरोनाच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (BJP mla Shashank Trivedi) आहेत.

लॉकडाऊन संपेपर्यंत भाजप आमदाराचा अन्नत्याग, कोरोनाच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत

लखनऊ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (BJP mla Shashank Trivedi) आहेत. त्यासोबत कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून केंद्र सरकारला आर्थिक मदत केली जात आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशचे भाजप आमदार शंशाक त्रिवेदी यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत अन्नत्याग केला आहे. तसेच सरकारला एक कोटींची मदत जाहीर केली आहे. त्रिवेदींच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभरातून त्यांचे कौतुक केले जात (BJP mla Shashank Trivedi) आहे.

आमदार शंशाक त्रिवेदी म्हणाले, “सध्या देशातील अनेकांना खाद्य पदार्थ मिळत नाही. आमच्याकडे अनेक गरीब लोक येत आहेत. गरिबांना जेवण सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे मी लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत अन्नत्याग करत आहे. आमच्या राज्यात अनेक लोक उपाशी आहेत. त्यांना मी जेवण देणार आहे.

“गरिबांची मदत करण्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. ही प्रेरणा मला माझ्या वडिलांकडून मिळाली आहे. माझ्या वडिलांनी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या सांगण्यावरुन तांदूळ खाणे सोडले होते. सध्या देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मी अन्नत्याग करुन गरीबांना जेवण वाटणार आहे”, असं त्रिवेदी यांनी सांगितले.

“कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून एक कोटींची मदत देत आहे. जेणेकरुन हा विषाणू रोखण्यासाठी आणि उपचारांमध्ये याची मदत होईल”, असंही त्रिवेदी यांनी सांगितले.

दरम्यान, शंशाक त्रिवेदी हे उत्तर प्रदेशातील सीतापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात 3 हजार पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 183 बरे झाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *