केवळ मतदार नोंदणी आणि व्हॉटसअ‍ॅपवरुन निवडणुका जिंकता येत नाहीत: सुजय विखे-पाटील

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना भाजपची भूमिका समजावून सांगितली पाहिजे. | Sujay Vikhe Patil

केवळ मतदार नोंदणी आणि व्हॉटसअ‍ॅपवरुन निवडणुका जिंकता येत नाहीत: सुजय विखे-पाटील
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 3:39 PM

हातकणंगले: केवळ मतदार नोंदणी करुन किंवा व्हॉटसअ‍ॅपवरून निवडणुका जिंकता येत नसतात, असे वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी केले. पुणे पदवधीर मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांना भाजपची भूमिका समजावून सांगितली पाहिजे. पुणे पदवधीर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सक्षम आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे, असा दावाही सुजय विखे पाटील यांनी केला. (Sujay Vikhe Patil in in pune graduate constituency election campaign)

यंदा महाविकासआघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होत असल्याने पुणे पदवीधर मतदारसंघाची लढत चुरशीची होणार आहे. पदवीधर निवडणुकीसाठी आम्ही यंदा मोठ्याप्रमाणावर मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा आमचा विजय निश्चित आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील यांनी हातकणंगले येथील प्रचारसभेत बोलताना महाविकासआघाडीला टोला लगावला. कागदोपत्री किंवा व्हॉटसअ‍ॅपवरुन निवडणुका जिंकता येत नाही, असे त्यांनी म्हटले.

हातकणंगले तालुक्यातील आळते इथल्या इंगवले मळ्यात भाजप मिञ पक्षाचे पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ भाजपा पदाधिकारी ,बुथ प्रमुख,शक्तिकेंद्र प्रमुखांचा मेळवा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाविकासआघाडीचे सरकार हे फसवे सरकार आहे. लवकर त्यांना पायउतार व्हावे लागेल. भाजपाची विजयी घोडदौड कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी भाजपाचे नेते जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले , हातकणंगले प्रचार प्रमुख बाळासाहेब गारे ,तालुका अध्यक्ष राजेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य इंगवले यांनी मनोगत व्यक्त केले.

या मेळाव्यास माजी जिल्हाअध्यक्ष हिंदुराव शेळके ,अमित गाठ,जिल्हा परिषद सदस्य , राजवर्धन निंबाळकर , पृथ्वीराज यादव, तानाजी ढाले, नगरसेवक राजु इंगवले , किरण इंगवले , नाना जाधव, बंडा गोंदकर , सतीश घाटगे, भुपाल कांबळे यांचेसह बुथप्रमुख शक्तिकेंद्र प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

Pune | पुणे पदवीधर मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांचा झंझावाती प्रचार

पुणे पदवीधर निवडणुकीच्या मतदान केंद्रावर आता वैद्यकीय अधिकारी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय

पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत

(Sujay Vikhe Patil in in pune graduate constituency election campaign)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.