"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं"

कृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नाहीच, असा दावा करत 'ये अंदर की बात हैं...शरद पवार हमारे साथ हैं', असं सूचक वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. (BJP Nitesh Rane On Sharad pawar)

"ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं"

सिंधुदुर्गकृषी विधेयकाला राष्ट्रवादीचा विरोध नाहीच, असा दावा करत ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं’, असं सूचक वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलंय. सिंधुदुर्गात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी चौफेर फटकेबाजी केली. (BJP Nitesh Rane On Sharad pawar)

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल सभागृहात कृषी विधेयकावर बोलले पण त्यांनी या विधेयकाला कुठेही विरोध केला नाही, फक्त त्यांनी सभात्याग केला. मी तुम्हाला इतकंच सांगू शकतो की एक घोषणा आहे ना… ‘ये अंदर की बात है’, त्याप्रमाणे ‘ये अंदर की बात हैं…शरद पवार हमारे साथ हैं, असं नितेश म्हणाले.

कृषी विधेयकावरून त्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. शेती आणि शिवसेनेचा कसलाही संबंध नाही. कृषी विधेयकावर संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांच्या पक्षाला नेमकं कुठं जायचंय, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे त्यांना हेच माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

नितेश राणे म्हणाले, जेव्हा हे विधेयक सभागृहात मांडण्यात आलं तेव्हा महाविकास आघाडीतील दुसरे पक्ष मग राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, आपण जर त्यांच्या नेत्यांची भाषणं व्यवस्थित ऐकली तर असं लक्षात येईल की संजय राऊतांनी तळ्यात मळ्यात भाषण केलं. त्यांना माहितीच नाही की त्यांच्या पक्षाला नेमकं जायचंय कुठं, किंबहुना शेती कुठे करतात आणि कशी करतात हे त्यांच्या नेतृत्वाला माहिती नाही. शेतीवर ते कधीही भूमिका घेत नाहीत.

काँग्रेस कृषी विधेयकाला करत असलेल्या विरोधावर बोलताना नितेश म्हणाले, “काँग्रेस पक्ष आज पुढे येऊन आंदोलन करतोय पण स्वत: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांचे 2013 ला विधान आहे की आम्ही जर सत्तेत आलो की बाजार समित्या रद्द करू.
तसंच 2019 च्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी तेच आश्वासन दिलं होतं. ते जे करणार होते तेच आताच्या सरकारने पाऊल उचललं आहे मग त्यांचा आता विरोध कशासाठी? की फक्त विरोधाला विरोध करायचा म्हणून ते विरोध करतायत?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

संपूर्ण देशभरातला शेतकरी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणा उभा आहे. काही मोजकी राज्य सोडली तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना विश्वास की आम्हाला मोदींनी न्याय दिलाय. केंद्र सरकारने आमच्या भविष्याला आकार दिलाय, त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाला काही अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या

शरद पवारांचा कृषी विधेयकाला विरोध नाहीच- देवेंद्र फडणवीस

कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *