नवरा काळा असल्याचा राग, 22 वर्षीय बायकोने नवऱ्याला जिवंत जाळलं!

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बरेलीत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने स्वत:च्या पतीला जिवंत जाळलं. धक्कादायक म्हणजे पती काळा असल्याच्या द्वेषातून पत्नीने हे अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पतीला पेटवल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. बरेलीतील खुर्द फतेहगड परिसरात ही घटना …

नवरा काळा असल्याचा राग, 22 वर्षीय बायकोने नवऱ्याला जिवंत जाळलं!

लखनऊ: उत्तर प्रदेशातील बरेलीत धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने स्वत:च्या पतीला जिवंत जाळलं. धक्कादायक म्हणजे पती काळा असल्याच्या द्वेषातून पत्नीने हे अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. पतीला पेटवल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. बरेलीतील खुर्द फतेहगड परिसरात ही घटना घडली.

सत्यवीर सिंह असं मृत्यू झालेल्या पतीचं नाव आहे. सत्यवीर यांची 22 वर्षीय पत्नी प्रेमश्रीने त्यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिलं. पती काळा आहे या द्वेषातून तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

सत्यवीर आणि प्रेमश्रीचं लग्न दोन वर्षापूर्वी झालं होतं. त्यांना पाच महिन्यांची एक मुलगी आहे. मात्र सत्यवीर प्रेमश्रीला कधीही आवडला नाही. सत्यवीर काळा असल्याने ती त्याला पसंत करत नव्हती.

गेल्या सोमवारी 5 वाजता सत्यवीर सिंह झोपला होता. त्यावेळी पत्नी प्रेमश्रीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. त्यावेळी सत्यवीरने आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक तिथे तातडीने आले आणि त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापासूनच प्रेमश्री सत्यवीरला पसंत करत नव्हती, मात्र सत्यवीरचं तिच्यावर खूप प्रेम होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *