Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर
Picture

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 190 वर, आज नव्या 2608 रुग्णांची नोंद, दिवसभरात 821 रुग्णांना डिस्चार्ज

23/05/2020,7:44PM
Picture

पुण्यातील जनता वसाहतीत चार नवे रुग्ण, आकडा 46 वर

पुणे : पुण्यातील जनता वसाहतमध्ये कोरोनाचा कहर कायम, शुक्रवारी नवीन चार कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, दोन दिवसात सहा नवीन बाधित रुग्ण वाढल्याने आतापर्यंत 46 बाधित रुग्ण, तर काल दोघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत चार बाधित रुग्णांचा मृत्यू, जनता वसाहतीत आज नवीन 12 जण क्वारंटाईन, आतापर्यंत एकूण 60 क्वारंटाईन, तर अजून 25 जणांचे अहवाल प्रलंबित, आणखी रुग्ण संख्या वाढण्याची भीती

23/05/2020,7:41PM
Picture

म्हाडा ठाण्यात 1 हजार बेडचं तात्पुरतं रुग्णालय उभारणार

ठाणे : म्हाडा ठाण्यात एक हजार बेडचं तात्पुरतं रुग्णालय बांधणार, ठाण्यातल्या कोरोगा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन निर्णय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

23/05/2020,7:37PM
Picture

नांदेडमध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण, आकडा 125 वर

नांदेड : नांदेडमध्ये कोरोनाचे 6 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 125 वर, तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, 52 जणांची कोरोनावर मात

23/05/2020,7:34PM
Picture

वसई-विरारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 468 वर

वसई-विरार : वसई-विरार नालासोपारा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या 450 च्या पार, आज एका दिवसात 33 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 2 जणांची कोरोनावर मात, वसई, विरार, नालासोपारा क्षेत्रात पॉझिटिव्ह रुगणाची संख्या 468 वर, यापैकी 17 जणांचा कोरोनाने मृत्यू

23/05/2020,7:32PM
Picture

कोल्हापुरात सोमवारपासून विमानसेवा सुरु होणार

कोल्हापुरात सोमवारपासून विमानसेवा सुरु होणार, एअर अलायन्स आणि इंडिगोची विमानसेवा सुरु होणार, प्रवाशांसाठी ऑनलाईन बुकिंग सुरु, कोल्हापूरहून हैद्राबाद, तिरुपती विमानसेवा सुरु होणार आहे, आठवड्यातून चार दिवस असणार विमानसेवा, आठवडाभर कोल्हापूर बंगळूर विमानसेवा सुरू राहणार, ऑनलाईन बुकिंगला प्रवाशांचा प्रतिसाद

23/05/2020,2:14PM
Picture

राज्यपाल आणि संजय राऊत यांच्या भेटीचा फोटो राज्यपाल कार्यालयाकडून शेअर

23/05/2020,2:11PM
Picture

पुण्यात धुमधडाक्यात लग्न, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा, वधू-वर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल

23/05/2020,2:10PM
Picture

आम्ही जाहीर केलेलं पॅकेज पाहून भाजप नेत्यांचे डोळे पांढरे होतील : हसन मुश्रीफ

23/05/2020,2:09PM
Picture

राज्यात एकूण 1671 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात एकूण 1671 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, आज दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, राज्यात आतापर्यंत एकूण 18 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू, 174 अधिकारी आणि 1497 पोलीसांना कोरोनाची लागण

23/05/2020,2:04PM
Picture

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची राजकारणातून निवृत्ती

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करुन निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचा खुलासा त्यांनी केला. हर्षवर्ध जाधव दोन वेळा कन्नड मतदारसंघाचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने जाधव अस्वस्थ होते. राजकीय आणि कौंटुबिक कलहामुळे जाधव नेहमी चर्चेत होते.

23/05/2020,1:53PM
Picture

नाशिकमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह, यामध्ये एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा समावेश, मालेगाव बंदोबस्ताला असाताना लागण झाली, कॉलेज रोड परिसरात पोलीस अधिकारी राहत होते.

23/05/2020,1:49PM
Picture

कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास हायकोर्टाची परवानगी

कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. कोरोना रुग्णाच्या मृतदेहाविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. कब्रस्तानमध्ये कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास विरोध करण्यात येत होता. याबाबत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली होती.

23/05/2020,1:35PM
Picture

नागपुरात एका भिकाऱ्यासह तीन जणांना कोरोनाची लागण

नागपुरात एका भिकाऱ्यासह तीन जणांना कोरोनाची लागण, भिकाऱ्याला कोरोनाची लागण कशी झाली याचा शोध सुरु, नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या 413 वर, तर 305 जणांची कोरोनावर मात.

23/05/2020,1:21PM
Picture

औरंगाबादमध्ये आणखी 23 कोरोना रुग्णांची भर

23/05/2020,1:07PM
Picture

धुळ्यात 12 तासांत 21 कोरोनाचे रुग्ण

23/05/2020,1:04PM
Picture

नगरच्या कोपऱ्यात बसून रोहित पवार माझं काय करणार? : निलेश राणे

23/05/2020,12:56PM
Picture

Pune Care | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खाजगी रुग्णालयातील 80% बेड्स ताब्यात घेणार

23/05/2020,12:53PM
Picture

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, राज्यपाल-मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर, पिता-पुत्राप्रमाणे : संजय राऊत

23/05/2020,12:52PM
Picture

हिंगोलीत आणखी 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

हिंगोलीत आणखी 6 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मुंबई येथून हिंगोली जिल्ह्यात परतलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण, हिंगोलीत करोनाबधितांची संख्या 107 वर पोहोचली 107 वर, त्यापैकी 89 जणांना डिस्चार्ज, 18 रुग्णांवर उपचार सुरु

23/05/2020,11:06AM
Picture

सोलापुरात कोरोनाचे 32 नवे रुग्ण

सोलापुरात कोरोनाचे आणखी नवे 32 रुग्ण आढळले आहेत. त्यात 21 पुरुष 11 स्त्रीयांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 548 कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. तर 40 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

23/05/2020,10:40AM
Picture

पुण्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज 10 कोटींचा फटका

पुण्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दररोज 10 कोटींचा फटका बसला आहे. कोरोना विषाणूच्या आधी प्रतिदिन 1 लाख 75 हजार लिटर दूध संकलन होत होते. पण कोरोनाच्या काळात रोज सव्वा दोन लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. कोरोनाच्या आधी दूथ उत्पादकाला लिटर मागे 31 रुपये मिळत होते. तर कोरोनाच्या काळात लिटर मागे 25 रुपये मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील दूध उत्पादकांना 10 ते 11 कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.

23/05/2020,10:37AM
Picture

कोल्हापुरात 31 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

कोल्हापुरात काल (22 मे) दिवसभरात 31 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. सकाळी 4 ते रात्री 23 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 259 वर पोहोचली आहे.

23/05/2020,10:28AM
Picture

औरंगाबादमध्ये आणखी 23 कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबादमध्ये आज 23 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 1241 वर पोहोचली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

23/05/2020,10:23AM
Picture

पुणे विभागातून एक लाख मजूर, कामगार मूळगावी रवाना

पुण्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या एक लाख मजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यात आले आहे. रेल्वेच्या पुणे विभागातून 7 मे पासून 77 श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्य आहेत. तर पुणे रेल्वे स्टेशनवरून 39 श्रमिक स्पेशल रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आदी राज्यात या कामगारांना रवाना करण्यात आले आहे.

23/05/2020,10:17AM
Picture

रत्नागिरीत आणखी पाच रुग्णांची कोरोनावर मात

रत्नागिरी आणखी पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कळंबुशी 1, माखजन 2, फुणगुस 1 आणि झाडगाव येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्या एकूण रुग्णांची संख्या 37 झाली आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 91 वर पोहोचली आहे.

23/05/2020,10:11AM
Picture

लॉकडाऊनमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊनमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील 17 ते 18 हजार कलावंतांचे कामबंद आहे. स+कारने आम्हाला मदत करावी अशी मागणी तमाशा कलावंतानी केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यातील सर्व कलाकेंद्र बंद आहेत. यात्रांच्या या काळात तमशा फड बंद झाल्याने लाखोंचे उत्पन्न बुडाले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मदत करण्याचे मान्य केल्याची माहिती तमाशा फडमालक रघुवीर खेडकर यांनी दिली.

23/05/2020,10:03AM
Picture

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 44 हजार 582 वर

23/05/2020,9:57AM
Picture

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 251 वर

23/05/2020,9:57AM
Picture

पुण्यात आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी

23/05/2020,9:56AM
Picture

सोलापूरमध्ये कोरोनाचे 32 नवे रुग्ण

23/05/2020,9:55AM
Picture

नाशिकमध्ये 25 मेपासून विमानसेवा सुरु

नाशिकमध्ये 25 मे पासून विमानसेवा सुरु होणार आहे. ओझर विमानतळावरुन अहमदाबाद आणि हैद्राबादसाठी उड्डाण होणार आहे. ऑनलाईन बुकिंगही सुरु झआले आहे. 160 आसनी बोइंग विमान, उडान योजनेअंतर्गत 50 टक्के प्रथम प्रवास्यांना सवलत देण्यात येणार आहे. त्यासोबत फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचं पालन केलं जाणार आहे.

23/05/2020,9:53AM
Picture

साताऱ्यात आणखी 40 नवे कोरोना रुग्ण

सातारा जिल्ह्यात आज आणखी 40 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. तर मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या 241 वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यन्त जिल्हयात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

23/05/2020,9:49AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

23/05/2020,9:46AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *