Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

सोलापुरात पोलिसांचा वेष परिधान करुन प्रँक व्हिडीओ करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

सोलापुरात संचारबंदीच्या काळात पोलिसांचा वेष परिधान करुन प्रँक व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे चौघे पोलिसांचा वेष परिधान करुन लोकांना भीती घालत होते. त्यामुळे पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले.

02/04/2020,12:25PM
Picture

पुण्यात होम क्वारंटाईनचे शिक्के असलेल्या 15 जणांचा एकाच वाहनातून प्रवास

पुण्यात होम क्वारंटाईनचे शिक्के असलेले 15 जण एकाच वाहतानू प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे. पुण्यातील वडगाव मावळ पोलिसांनी ही बाब उघडकीस आणली आहे. उस्मानाबाद येथून हे कुटुंब मुंबईमधील अंधेरी येथे निघाले होते.

02/04/2020,12:02PM
Picture

पिंपरी-चिंचवडमध्ये दोघांना कोरोनाची लागण

पिंपरी-चिंचवड परिसरातून निजामुद्दीन मरकजला गेलेल्या दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 23 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी काल 11 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

02/04/2020,11:56AM
Picture

बुलडाण्यात आणखी एक रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

बुलडाण्यात आज आणखी एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन निगेटिव्ह आले आरहेत. तसेच अजून तीन रिपोर्ट येणे बाकी आहेत, अशई माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली. बुलडाण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता पाचवर गेली आहे.

02/04/2020,9:50AM
Picture

पुण्यात दोन नागिराकंना कोरोनाची लागण

पुणे शरहरातील दोन नागरिकांना कोरोनोची लागण झाली असल्याचा अहवाल आला आहे. या दोघांवरही डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आथा 52 वर पोहोचला आहे.

02/04/2020,9:30AM
Picture

पुण्यात निजामुद्दीनहून आलेल्या 30 पैकी 20 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

पुण्यात निजामुद्दीहून आलेल्या 30 पैकी 20 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर उर्वरित 10 जणांचा रिपोर्ट दुपारपर्यंत येणार आहे. नायडू रुग्णालयात एकूण 40 जणांना दाखल करण्यात आले आहे. यापैकी 30 जण हे निजामुद्दीनहून आलेले आहेत. तर इतर 16 हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.

02/04/2020,9:25AM
Picture

संचारबंदीतही लातूरमध्ये नगारिक मॉर्निंग वॉकला, पोलिसांकडून कारवाई

संचारबंदी असूनही सकाळी मॉर्निंग वॉकला निघालेल्या 120 जणांवर लातूर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिवाजी नगर आणि एमआयडीसी पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतेले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांमध्ये शिक्षक, पत्रकार, अधिकारी, काँग्रेसचे पदाधीकारी यांचा समावेश आहे.

02/04/2020,9:20AM
Picture

पुण्यात 91 हजारपेक्षा अधिकांची पोलिसांकडे डिजिटल पाससाठी परवानगी

पुण्यात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त तब्बल 91 हजार पेक्षा जास्त लोकांनी पोलिसांकडे डिजिटल पाससाठी परवानगी मागितली. त्यात अनेकांनी दिलेली कारणे पटण्यासारखी नसून वैदयकीय उपचारांसाठी परवानगी असल्याचे कारण अनेकांनी दिले आहे. आतापर्यंत तब्बल 91 हजार 860 जणांनी डिजिटल पाससाठी अर्ज भरुन दिले आहेत़. 47 हजार 452 लोकांचे अर्ज पोलिसांनी नामंजूर केले आहेत. केवळ 19 हजार 860 जणांचे अर्ज मंजूर करुन त्यांना डिजिटल पास देण्यात आले आहेत.

02/04/2020,9:15AM
Picture

सोलापूरमधील निजामोद्दीन येथे गेलेल्या 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

निगेटिव्ह सोलापूरमधील निजामोद्दीन येथे गेलेल्या 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 11 जणांच्या संपर्कात असलेल्या इतर 14 जणांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सोलापूर जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्यातून मरकजला 17 जण गेले होते. यातील 11 जणांचा शोध लागला आहे. उर्वरित दोन जण दिल्लीत, एक पुण्यात तर दोन ठाण्यात आणि एकजण किशनगडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले आहे.

02/04/2020,9:08AM
Picture

कोल्हापूरमध्ये मकरजसाठी गेलेल्या 19 जणांना क्वारंटाईन

दिल्लीतील मकरजसाठी कोल्हापूरमधून दोन गट गेल्याच समोर येत आहे. यामधील एका गटातील 19 जणांना दिल्लीतच क्वारंटाईन केल्याची माहिती मिळत आहे. 16 मार्चला दिल्लीहून कोल्हापूरात 10 लोक आले होते. यातील पाच जण कार्यक्रमात सहभागी झाले होते तर इतर पाच कामासाठी दिल्लीला गेले होते.

02/04/2020,9:02AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *