मुंबई-पुणे रिटर्नने बुलडाण्यात कोरोनाबाधितांची वाढ, आतापर्यंत 48 जणांना लागण

ग्रामीण भागात कोरोनाने हात पाय पसरले (Buldana Corona Patient Update) आहेत. बुलडाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 48 वर पोहोचला आहे.

मुंबई-पुणे रिटर्नने बुलडाण्यात कोरोनाबाधितांची वाढ, आतापर्यंत 48 जणांना लागण

बुलडाणा : राज्यासह ग्रामीण भागात कोरोनाने हात पाय पसरले (Buldana Corona Patient Update) आहेत. बुलडाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 48 वर पोहोचला आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये शासनाने काही प्रमाणात शिथीलता दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे यासारख्या शहरात अडकलेल्यांना मूळगावी जाण्यास मुभा मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंत बुलडाण्यात एक लाखाहून अधिक नागरिक जिल्ह्यात परतले आहेत.

मुंबई-पुणे शहरातून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाबाधितांची (Buldana Corona Patient Update) संख्या 48 वर पोहोचली आहे. यातील 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहेत. तर अद्याप 18 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात प्रशासनाने कोरोना रुग्ण आढळलेल्या ठिकाणचा परिसर सील केला आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. खामगाव, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, चिखली हे तालुके हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले आहे. त्या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्यात येते आहेत. तर कन्टेंमेंट झोनमध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणीसुद्धा करण्यात येत आहे.

बुलडाण्यात सध्या 59 नागरिकांचे अहवाल प्रलंबित आहेत. कोरोनाशी लढणाऱ्या जिल्हा पोलिसांची स्वतंत्र वैद्यकीय सेवा करण्यात येत आहे. त्यामुळे खामगाव आणि बुलडाणा येथे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात बाहेर गावावरुन येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना संसर्ग पसरतो (Buldana Corona Patient Update) आहे.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 105 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 56,948 वर

नाशिकमध्ये आणखी 52 कोरोना रुग्णांची वाढ, एकूण आकडा 1053 वर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *