भरधाव कारचा टायर फुटला, पाच जणांचा जागीच मृत्यू

बेळगाव : बेळगाव येथील महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात श्रीनगर गार्डनजवळ झाला. अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर केएलई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मृत औरंगाबाद येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. औरंगाबादहून कारने बंगळुरुला जात असताना कारचा टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून …

भरधाव कारचा टायर फुटला, पाच जणांचा जागीच मृत्यू

बेळगाव : बेळगाव येथील महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात श्रीनगर गार्डनजवळ झाला. अपघातात पाचजणांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीवर केएलई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मृत औरंगाबाद येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

औरंगाबादहून कारने बंगळुरुला जात असताना कारचा टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरुन पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने कारमधील पाचजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी आहे.

या अपघातात मृत झालेल्यांची नावे पोलिसांना मिळू शकली नाही. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *