बारामतीतल्या सक्सेस कंपनीचा महिला बचत गटांना लाखोंचा गंडा

पुणे : शिवजीत सक्सेल प्रा. लि. कंपनीच्या माध्यामातून अनेक महिला बचतगटांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा या बचतगटांना घालण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील विविध बचतगटांना या कंपनीद्वारे फसवण्यात आलं आहे. बारामती तालुका पोलिसांत या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी तुकाराम …

बारामतीतल्या सक्सेस कंपनीचा महिला बचत गटांना लाखोंचा गंडा

पुणे : शिवजीत सक्सेल प्रा. लि. कंपनीच्या माध्यामातून अनेक महिला बचतगटांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा या बचतगटांना घालण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील विविध बचतगटांना या कंपनीद्वारे फसवण्यात आलं आहे. बारामती तालुका पोलिसांत या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजी तुकाराम ढमढेरे आणि मंदाराणी शिवाजी ढमढेरे या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यातल्या राहू पिंपळगाव येथील शिवाजी ढमढेरे आणि मंदाराणी ढमढेरे या दोघांनी गावोगावी जाऊन पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचं प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचं अमिष दाखवलं होते. या अमिषाला बळी पडत बारामती तालुक्यातील खांडज येथील अनिसा आस्लम शेख आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी 2016 मध्ये सक्सेस ग्रुपअंतर्गत श्री महालक्ष्मी नारायण महिला बचतगटाची स्थापना केली. यामध्ये तब्बल 23 महिला प्रत्येक महिन्याला 200 रुपये जमा करत होत्या. ही सर्व रक्कम सक्सेस ग्रुपकडे जमा केली जात होती. यानंतर ढमढेरे दांपत्यांनी शिवजीत सक्सेस प्रा. लि. कंपनीची स्थापना करुन त्यांच्या आयडीबीआय बँक खात्यात ही रक्कम जमा केली जात होती.

एक वर्ष पैसे जमा करुनही कोणत्याच योजनेचं प्रशिक्षण अथवा रोजगाराबाबत हालचाली होत नसल्याने महिलांमध्ये संशय निर्माण झाला. यामुळे संबंधित महिलांनी ढमढेरे यांना याबद्दल विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. यामुळे संबंधित महिलांनी पुण्यात जाऊनही चौकशी केली. मात्र त्याही ठिकाणी रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आल्यानं महिलांनी थेट बारमती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

घरखर्चातून बचत करुन जमा केलेला पैशांना शिवजीत सक्सेस कंपनीकडून गंडा घातला गेल्यानं महिला हवालदिल झाल्या आहेत. आता पोलिसांनी या आरोपींना शोधून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या महिलांकडून करण्यात येत आहे. अशी फसवणूक झाल्यास पोलिसांनी संपर्क साधण्याचं आवाहनही केलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *