ऑस्ट्रेलियात दमदार खेळी, पुजाराचा पगार कोहलीइतका होणार?

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या बहुतेक खेळाडूंनी चमकदार कामागिरी केली आहे. टीम इंडियाचा हुकमी एक्का अर्थात चेतेश्वर पुजाराची खेळी तर आणखीच दमदार ठरली आहे. पुजाराने चार कसोटींमधील सात डावांमध्ये 74.21 च्या सरासरीने 521 धावा आपल्या खात्यात जमा केल्या. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर नोंदवला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ …

ऑस्ट्रेलियात दमदार खेळी, पुजाराचा पगार कोहलीइतका होणार?

सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या बहुतेक खेळाडूंनी चमकदार कामागिरी केली आहे. टीम इंडियाचा हुकमी एक्का अर्थात चेतेश्वर पुजाराची खेळी तर आणखीच दमदार ठरली आहे. पुजाराने चार कसोटींमधील सात डावांमध्ये 74.21 च्या सरासरीने 521 धावा आपल्या खात्यात जमा केल्या. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर नोंदवला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय पुजाराला ‘ए प्लस’ श्रेणीत समाविष्ट करण्याची शक्यता आहे.

चेतेश्वर पुजाराला बीसीसीआयने ‘ए प्लस’ श्रेणीत समाविष्ट केल्यास पुजाराचा पगारही वाढणार आहे. बीसीसीआयचे प्रशासक विनोद राय, निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासमोर पुजाराला ‘ए प्लस’मध्ये समाविष्ट करण्यासंबंधी प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो.

‘ए प्लस’ श्रेणीत आता कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांचा समावेश आहे. त्यामुळे या यादीत चेतेश्वर पुजाराचाही समावेश झाल्यास त्याच्या मानधनातही वाढ होईल.

बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चेतेश्वर पुजारा याला त्याच्या दमदार खेलीचं बक्षीस मिळालं पाहिजे. सीओए प्रमुख यासंदर्भात प्रशिक्षक, कर्णधार आणि निवड समितीशी बोलणारही आहेत.”. तसेच, पुजाराला ‘ए प्लस’ श्रेणीत आणल्यास युवा खेळाडूंसाठीही सकारात्मक संदेश मिळाले. शिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये चांगल्या खेळीसाठी ते प्राधान्य देतील, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

AusvsInd: पुजाराची हुकमी तर पंत-जाडेजाच्या वादळी खेळीने दिवस गाजवला

अॅडलेड कसोटी : पुजाराच्या शतकाने भारताची लाज राखली!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *