आता साई मंदिरात एका वर्षाखालील मुलांना नेल्यास नोंदणी करावी लागणार

नगर : शिर्डीतील साई मंदिरातील गुरुस्थान येथे दानपेटीजवळ नुकतंच एक सहा महिन्यांची मुलगी सापडली होती. यावेळी साई संस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मुलीची आईच तिला बेवारस सोडून गेल्याचं उघडकीस आलं होतं. या घटनेचा बोध घेत साई संस्थानाने यापुढे एका वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेशावेळी पालकांना रजिस्टरमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. आज 1 जूनपासून या निर्णय …

आता साई मंदिरात एका वर्षाखालील मुलांना नेल्यास नोंदणी करावी लागणार

नगर : शिर्डीतील साई मंदिरातील गुरुस्थान येथे दानपेटीजवळ नुकतंच एक सहा महिन्यांची मुलगी सापडली होती. यावेळी साई संस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्या मुलीची आईच तिला बेवारस सोडून गेल्याचं उघडकीस आलं होतं. या घटनेचा बोध घेत साई संस्थानाने यापुढे एका वर्षाखालील बालकांना मंदिरात प्रवेशावेळी पालकांना रजिस्टरमध्ये नोंदणी करावी लागणार आहे. आज 1 जूनपासून या निर्णय लागू करण्यात आला आहे.

शिर्डी साईबाबा मंदिरात दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी 31 मे सकाळी 6 वाजल्याच्या दरम्यान एक महिला आली होती. तिच्या हातात एक लहान मुलगी होती. या महिलेने मुलीसह साई मंदिराच्या गेट क्रमांक 4 मधून प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर ही महिला मुलीसह गुरुस्थान मंदिराच्या दानपेटीजवळ पोहोचली. गर्दीचा फायदा घेत त्या महिलेने मुलीला तिथेच सोडले आणि ती  गेट क्रमांक 3 वरुन बाहेर पडली. दरम्यान या सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

यानंतर काही भाविकांनी या चिमुकल्या मुलीला साई संस्थानाकडे दिलं. त्यानंतर संस्थानाने या चिमुकलीची रुग्णालयात प्राथमिक तपासणी करुन तिची रवानगी नगरच्या चाईल्ड लाईन संस्थेत करण्यात आली आहे.

मात्र हृद्य पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे शिर्डी साई मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर महिलेचा तपास करत आहेत.

या घटनेमुळे यापुढे शिर्डी साई मंदिरात प्रवेश करणाऱ्या पालकांसोबत एक वर्षाखालील बालक असल्यास, त्यांना नोंदणी करावी लागेल, असा नवा नियम लागू केला आहे. नोंदणीवेळी पालकांना त्यांच्या ओळखीसाठी गेटवरील रजिस्टरमध्ये नाव , पत्ता , मोबाईल क्रमांकाची नोंद करणे अनिवार्य आहे. शिर्डी साई मंदिर परिसरात येण्यासाठी एकूण 5 गेट आहे. यातील 3 आणि 4 क्रमांकाच्या गेटवरुन भाविक मंदिर परिसरात प्रवेश करतात. या दोन्ही गेटवर आजपासून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *