'CID' चे दिग्दर्शक FTII च्या अध्यक्षपदी

पुणे : सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध ‘सीआयडी’ या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक ब्रिजेंद्र पाल सिंग यांची भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्रिजेंद्र पाल सिंग यांच्या नावाची घोषणा केली. कोण आहेत ब्रिजेंद्र पाल सिंग? निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून ब्रिजेंद्र पाल सिंग हे प्रसिद्ध आहेत. मूळचे देहरादूनचे असलेल्या ब्रिजेंद्र …

'CID' चे दिग्दर्शक FTII च्या अध्यक्षपदी

पुणे : सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध ‘सीआयडी’ या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक ब्रिजेंद्र पाल सिंग यांची भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या (FTII) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्रिजेंद्र पाल सिंग यांच्या नावाची घोषणा केली.

कोण आहेत ब्रिजेंद्र पाल सिंग?

निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून ब्रिजेंद्र पाल सिंग हे प्रसिद्ध आहेत. मूळचे देहरादूनचे असलेल्या ब्रिजेंद्र पाल सिंग यांनी FTII मधूनच सिनेमा या विषयात शिक्षण पूर्ण केलं. ‘फायरवर्क्स प्रॉडक्शन’चे ते सर्वेसर्वा आहेत.

1998 साली त्यांनी सोनी टीव्हीवरील ‘सीआयडी’ या मालिकेची निर्मिती केली. या मालिकेचे दिग्दर्शकही तेच होते. भारतात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या मालिकांमध्ये अव्वल स्थानी ‘सीआयडी’ मालिकेचा क्रमांक लागतो. सर्वाधिक काळ चालू राहिलेली मालिका म्हणूनही ‘सीआयडी’ मालिकेकडे पाहिले जाते. या मालिकेत ब्रिजेंद्र पाल सिंग यांनी ‘डीसीपी चित्रोळे’ ही भूमिकाही काही काळ साकारली होती.

‘सीआयडी’ मालिकेसोबतच सोनी टीव्हीवरील ‘आहट’ या मालिकेची निर्मितीही ब्रिजेंद्र पाल सिंग यांनी केली. तसेच, ‘लाईफ ओके’ वाहिनीवर ‘हम ने ले रही है – शपथ’ ही गुन्हेगारी विश्वावर आधारित मालिकाही केली.

FTII काय आहे?

भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII) पुण्यात आहे. सिनेमा विषयासंदर्भात प्रशिक्षण देणारी ही संस्था असून, केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे. 1960 साली या संस्थेची स्थापना झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *