हृदयविकार, मधुमेह आणि स्थूलपणा, हायरिस्क रुग्णांना मुख्यमंत्र्यांचा मोलाचा सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackerays appeal to high risk patients) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधून, कोरोनाविरुद्धच्या लढ्याची माहिती दिली.

हृदयविकार, मधुमेह आणि स्थूलपणा, हायरिस्क रुग्णांना मुख्यमंत्र्यांचा मोलाचा सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray appeals to high risk patients) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधून, कोरोनाविरुद्धच्या लढ्याची माहिती दिली. “ज्या निवृत्त सैनिकांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे, निवृत्त सिस्टर किंवा वॉर्डबॉय किंवा भरतीची संधी न मिळालेल्या प्रशिक्षित व्यक्तींनी कोरोनाविरुद्धच्या युद्धात सामील व्हावे”, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी हायरिस्क रुग्णांना मोलाचा सल्ला दिला. (Uddhav Thackeray appeals to high risk patients)

“तुमच्या खाण्यावर बंधन आणत नाही. पण ज्यांना ज्यांना ह्रदयविकार, मधुमेह, स्थूलपणा आहे त्यांनी अधिक काळजी घ्या. बंधने ठेवा, कारण हे सर्व हायरिस्क ग्रुप मध्ये आहेत. घरी राहा पण तंदुरुस्त रहा. योगासने, हलके फुलके व्यायाम करा. कारण हे युद्ध आपण जिंकणारच आहोत. पण यानंतरचे युद्ध घसरणाऱ्या अर्थव्यवस्थेशी आहे. त्यासाठी आपली पूर्ण ताकद, हिम्मत लागणार आहे. हे युद्ध जिंकल्यावर आर्थिक युद्ध लढण्यासाठी आपली शारीरिक क्षमता राखायची आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

माझे टीव्ही वाहिन्यांना देखील आवाहन आहे की कोरोनाच्या बातम्या तर आहेतच पण नागरिक तणावमुक्त राहतील आणि वातावरण हलकेफुलके राहील असे कार्यक्रम दाखवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी टीव्ही वाहिन्यांना केलं.

जगभरातल्या बातम्या येताहेत. अमेरिका जपान, सिंगापूर येथील आकडा वाढतोय पण कालच बातमी आली की चीनच्या वुहानमध्ये निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. ही दिलासा देणारी बातमी आहे. त्यांना यासाठी ७०-७५ दिवस लागले. आपण जर असंच दक्षतेने सामना केला तर आपल्याकडे देखील ही परिस्थिती बदलेल. मला खात्री आहे, आपण निश्चित बाहेर पडणार, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

निवृत्त सैनिकांना आवाहन

मुख्यमंत्री म्हणाले, “कोविड उपचारासाठी आम्ही रुग्णालयांची विभागणी केली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे असतील , मध्यम स्वरुपाची , तसेच कोरोना शिवाय इतरही रोग असतील अशी तीन रुग्णालयांची विभागणी केली असेल. त्यात निष्णात  डॉक्टर असतील निवृत्त सैनिक आहेत, ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे . अनेक वोर्ड बॉय,  निवृत्त परिचारिका, वैद्यकीय सहायता प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल  त्यांना सहभागी करुन घेऊ. त्यांना मी आवाहन करतोय की महाराष्ट्राला आपली गरज आहे. केवळ अशांनी Covidyoddha@gmail.com या इमेलवर आपली माहिती द्यावी”

आपण आपले वीर, आपणच आपले शत्रू आपण आपले रक्षक हे लक्षात ठेवा, घर हे आपल्यासाठी गड-किल्ले आहेत. तिथेच आपण सुरक्षित आहोत. घराबाहेर पडू नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

संबंधित बातम्या 

केंद्राने जे दिलंय ते वाटतोय, पण केंद्राने सगळंच दिलंय असा गैरसमज नको : मुख्यमंत्री

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *