अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला

अमित ठाकरे यांनी काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला होता. (CM Uddhav Thackeray Keeps his Promise to Amit Thackeray)

अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला
Follow us
| Updated on: May 07, 2020 | 4:50 PM

मुंबई : पुण्यात अडकलेल्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अमित ठाकरे यांनी मांडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या बारा तासात आपला शब्द पाळला. लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची पहिली बस आज (गुरुवारी) अहमदनगरला रवाना झाली. (CM Uddhav Thackeray Keeps his Promise to Amit Thackeray)

“आपल्या प्रयत्नांनामुळे आज लालपरी विद्यार्थ्यांना घेऊन घरी चालली. आम्हास खात्री आहे पुण्यातील प्रत्येक विद्यार्थी जोपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत आपण नक्कीच पाठपुरावा करणार” असं ट्वीट एमपीएससी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य’ने केलं आहे.

अमित ठाकरे यांना पुण्यात अडकलेल्या, एमपीएससी परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी काल संवाद साधला होता. त्यानंतर अमित ठाकरे यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला.

संपूर्ण बातमी इथे वाचा  : आधी पत्र, आता अमित ठाकरेंचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन, उद्धव ठाकरे म्हणतात…

या विद्यार्थ्यांची तात्काळ आपापल्या घरी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, बसची सोय करण्यात यावी, अशी विनंती अमित ठाकरे यांनी केली होती. त्यावर, दोन दिवसांत या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.

मुंबई पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा सर्वांना पुढील चार दिवसात आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा दिली जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत काल सकाळीच घोषणा केली होती. (CM Uddhav Thackeray Keeps his Promise to Amit Thackeray)

आधी पत्र आता फोन

अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णांच्या अडचणींची माहिती देणारं पत्र रविवारी लिहिलं होतं. “उपचारादरम्यान अनेक नागरिकांना आमच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा असे सांगण्यात येत आहे. अशावेळी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची मनस्थिती बिकट असते. या परिस्थितीत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन सर्व रुग्णालयाची माहिती अॅपवर उपलब्ध करावी.” अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली होती.

(CM Uddhav Thackeray Keeps his Promise to Amit Thackeray)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.