मोदीजी, तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : देशासाठी बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत बेताल वक्तव्य केलं होतं. या सभेत मोदींनी राजीव गांधी यांचं आयुष्य भ्रष्टाचारी म्हणूनच संपल्याची टीका केली होती. मोदींनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक नेत्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. राजीव गांधी यांच्यावर मोदींनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका […]

मोदीजी, तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे, राहुल गांधींचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

नवी दिल्ली : देशासाठी बलिदान देणाऱ्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत बेताल वक्तव्य केलं होतं. या सभेत मोदींनी राजीव गांधी यांचं आयुष्य भ्रष्टाचारी म्हणूनच संपल्याची टीका केली होती. मोदींनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेक नेत्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. राजीव गांधी यांच्यावर मोदींनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आता पलटवार केला आहे. ‘तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहेत’, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. तर ‘देशासाठी आपले प्राण गमावलेल्या एका व्यक्तीचा तुम्ही अपमान केला’, असं प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा 

“मोदीजी, लढाई आता संपलीय. तुमचे कर्म तुमची वाट पाहत आहे. माझ्या वडिलांवर टीका करुनही तुम्ही आता वाचू शकत नाहीत. अशाप्रकारे सौम्य भाषेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या वक्त्व्यावर टीका केली. ‘All my love and a huge hug’, असेही राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं.

मोदींना अमेठीची जनता उत्तर देईल : प्रियांका गांधी

प्रियांका गांधी यांनी, ”शहिदांच्या नावे मत मागणाऱ्या आणि त्यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी काल (शनिवारी) आणखी एका चांगल्या आणि पवित्र व्यक्तीचा अपमान केला. ज्यांच्यासाठी राजीव गांधींनी आपला जीव गमावला, हिच अमेठीतील जनता तुमच्या या वक्तव्याचं उत्तर देईल. हा देश धोका देणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही मोदीजी”, असं ट्वीट प्रियांका गांधी यांनी केलं.

नेमकं प्रकरण काय?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात काँग्रेस, गांधी कुटुंब यांच्याबद्दल टोकाचा द्वेष आहे. यावरुन त्यांनी आतापर्यंत अनेकदा टीका केली आहे. नुकतंच उत्तरप्रदेशातील प्रतापगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी एका सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी “तुमच्या वडिलांना इतर देशांनी जरी क्लीन चिट दिली असली, तरी त्यांचं आयुष्य भ्रष्टाचारी म्हणूनच संपलं. ‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ मिरवणाऱ्या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणूनच झाला”, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधी यांच्याविषयी केलं होतं.

 संबंधित बातम्या :

स्पेशल रिपोर्ट : ‘राजीव गांधींमुळे मी जिवंत’, असं म्हणणाऱ्या वाजपेयींचा वारसा मोदी विसरले?

निम्मे मतदान झालंय, आमची अंतर्गत माहिती, भाजप हरतंय : राहुल गांधी

भाजपच्या मतांचं विभाजन करण्यासाठी आम्ही उमेदवार दिलेत : प्रियांका गांधी

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.