भाजपचं वर्तन 'कोरोना व्हायरस'पेक्षाही भयंकर : अशोक चव्हाण

'ऑपरेशन लोटस' आता नित्याचाच भाग झालेला आहे. आम्हा सर्वांना याची सवय झालेली आहे, असा टोला अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला Ashok Chavan compares BJP with Coronavirus

भाजपचं वर्तन 'कोरोना व्हायरस'पेक्षाही भयंकर : अशोक चव्हाण

मुंबई : ‘ऑपरेशन लोटस’ नाही, भाजपचं वर्तन ‘कोरोना व्हायरस’पेक्षाही भयंकर आहे. पण त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार उलथवण्यासाठी भाजपने सत्ताधाऱ्यांचे आठ आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप (Madhya Pradesh Operation Lotus) काँग्रेस नेत्यांनी केला आहे. (Ashok Chavan compares BJP with Coronavirus)

मला वाटतं ‘ऑपरेशन लोटस’ आता नित्याचाच भाग झालेला आहे. आम्हा सर्वांना याची सवय झालेली आहे. जे-जे पक्ष लोकशाहीला मानणारे आहेत. ते कधीही ‘ऑपरेशन लोटस’ला यशस्वी होऊ देणार नाहीत. देशात लोकशाही मार्गानेच सरकार चालली पाहिजेत, मग ती कोणाचीही असू देत, असं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं.

ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाही, तिथले आमदार फोडण्याचा प्रयत्न असतो. कमलनाथ सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा : मध्य प्रदेशात ‘ऑपरेशन लोटस’, 25 कोटी देऊन आठ आमदार फोडले, सत्ताधारी काँग्रेसचा आरोप

ऑपरेशन लोटसला खतपाणी घातलं जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा भाजप म्हणजे कोरोना व्हायरसपेक्षा कठीण वर्तन करत आहे. त्यामुळे दक्षता घेतली पाहिजे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग आला. भाजपने सत्ताधाऱ्यांच्या आठ आमदारांना हॉटेलमध्ये कोंडल्याचा दावा केला जात असून त्यांना 25 ते 35 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसचे चार, तर मित्रपक्षांचे चार, अशा आठ आमदारांना गुरुग्राममधील एका मोठ्या हॉटेलमध्ये बळजबरीने डांबून ठेवले आहे. मध्य प्रदेशात काल रात्री उशिरा या घडामोडी घडल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेसने केला आहे

Ashok Chavan compares BJP with Coronavirus

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *