फोडाफोडीची भीती, महाराष्ट्रातील आमदारांना काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यात हलवलं!

फोडाफोडी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने 30 ते 35 आमदारांना जयपूरला पाठवल्याची माहिती आहे.

फोडाफोडीची भीती, महाराष्ट्रातील आमदारांना काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यात हलवलं!
Follow us
| Updated on: Nov 08, 2019 | 9:22 AM

मुंबई : सत्तास्थापनेच्या वेळी आमदारांची फोडाफोड टाळण्यासाठी काँग्रेसने आमदारांना थेट ‘पिंक सिटी’ला पाठवलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने 30 ते 35 आमदारांना जयपूरला पाठवल्याची माहिती (Congress MLAs out of Maharashtra) आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर काही नेते दिल्लीत हायकामंडला भेटायला जाणार आहे. सत्तास्थापनेतील तिढा आणि शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेस नेत्यांची चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

30 ते 35 आमदारांना पुणे, नागपूर, औरंगाबादवरुन जयपूरला पाठवण्यात आलं आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले, विकास ठाकरे, राजू पारवे विमानाने दिल्लीमार्गे जयपूरला रवाना झाले आहेत.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 44 आमदार निवडून आले आहेत.

शिवसेनेने हिंमत करुन सत्तास्थापनेचा दावा करावा : छगन भुजबळ

कर्नाटकमध्ये भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावलं होतं. या अनुभवातून धडा घेत काँग्रेसने सावधगिरी बाळगली आहे. काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये आमदार सुरक्षित राहतील, या विश्वासाने काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूरला हलवले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्तापालट केल्यानंतर अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले आहेत.

भाजपने काँग्रेस आमदारांशी संपर्क सुरु केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला होता. भाजप 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे ते सत्ता स्थापन करण्याचा दावा करु शकतात. मात्र बहुमतासाठी आमदारांची संख्या कमी असल्यामुळे फोडाफोडीचे राजकारण (Congress MLAs out of Maharashtra) होण्याची काँग्रेसला भीती आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
  • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
  • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
  • अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
  • एकूण – 288

Congress MLAs out of Maharashtra

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.