काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक साठीत बोहल्यावर

काँग्रेसचे दिग्गज नेते मुकुल वासनिक आणि रवीना खुराणा राजधानी दिल्लीत मोजक्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले Congress Leader Mukul Wasnik Wedding

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक साठीत बोहल्यावर

नवी दिल्ली : काँग्रेस महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक विवाहबंधनात अडकले आहेत. वयाची साठी पार केल्यानंतर वासनिक यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. रवीना खुराना यांच्याशी मुकुल वासनिक यांनी लगीनगाठ बांधली. (Congress Leader Mukul Wasnik Wedding)

राजधानी दिल्लीतील आलिशान ‘मौर्या शेरेटॉन हॉटेल’मध्ये मुकुल वासनिक यांचा विवाहसोहळा पार पडला. वासनिक यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी, तसेच काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा छोटेखानी समारंभ पार पडला.

काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक गहलोत, मनिष तिवारी, अहमद पटेल, अंबिका सोनी, गुलाम नबी आझाद या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांच्या ट्वीटमुळेच मुकुल वासनिक यांच्या विवाहाची सुखद बातमी सर्वांना मिळाली.

काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मुकुल वासनिक आणि रवीना खुराणा यांच्याशी असलेल्या जुन्या स्नेहबंधाला त्यांनी उजाळा दिला आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक गहलोत यांनीही वासनिक दाम्पत्याला आनंदी सहचर्यासाठी शुभेच्छा दिल्या. (Congress Leader Mukul Wasnik Wedding)

कोण आहेत मुकुल वासनिक?

मुकुल वासनिक हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बुलडाण्यातून तीन वेळा खासदारकी भूषवलेल्या बाळकृष्ण वासनिक यांचे पुत्र आहेत. सामाजिकदृष्ट्या मागास राहिलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी मुकुल वासनिक यांनी लग्नाचा विचार पुढे ढकलला होता, परंतु साठीनंतर त्यांनी संसाराची वाट धरल्याचं दिसत आहे.

मुकुल वासनिक 2009 मध्ये नागपूरमधील रामटेक लोकसभा मतदारसंघातून खासदारपदी निवडून आले होते. त्याआधी बुलडाणा मतदारसंघातूनही ते तीनवेळा खासदार झाले होते. 1984 मध्ये वयाच्या 25 व्या संसदेची पायरी चढणारे ते सर्वात तरुण खासदार ठरले होते.

हेही वाचा : “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल”, गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार

मुकुल वासनिक हे 1984 मध्ये राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (एनएसयूए) च्या अध्यक्षपदी निवडून आले. 1988 मध्ये भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा वासनिक यांच्या खांद्यावर होती.

मुकुल वासनिक यांचं नाव काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत घेतलं जात होतं. वासनिक यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषवलं आहे. त्यांना प्रशासकीय कामाचाही दांडगा अनुभवही आहे. (Congress Leader Mukul Wasnik Wedding)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *