शेतकरी मोर्चाला कोणत्या हिरोईनला आणायचं सांगा, नाही तर तहसिलदार मॅडम आहेच : बबनराव लोणीकर

माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर आपल्या विवादास्पद वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात (Controversial statement of Babanrao Lonikar).

शेतकरी मोर्चाला कोणत्या हिरोईनला आणायचं सांगा, नाही तर तहसिलदार मॅडम आहेच : बबनराव लोणीकर
Follow us
| Updated on: Feb 02, 2020 | 11:36 AM

जालना : माजी पाणी पुरवठा मंत्री आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर आपल्या विवादास्पद वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असतात (Controversial statement of Babanrao Lonikar). यावेळी त्यांनी केलेल्या एका बेताल वक्तव्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बबनराव लोणीकरांनी जालन्यातील परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या 33 केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात महिला तहसिलदारांचा थेट हिरोईन असा उल्लेख केला (Controversial statement of Babanrao Lonikar). त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

बबनराव लोणीकर म्हणाले, “अधिवेशनाआधी शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो. या मोर्चाला 50 हजार लोक यावेत. तुम्ही सांगा कुणाला आणायचं? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील की सुधीर मुनगंटीवार यांना आणायचं? तुम्हाला कोण वाटतंय ते सांगा, नाहीतर एखादी हिरोईन आणायची असंल तर हिरोईन पण आणू. जर कुणी हिरोईन नाहीच भेटली, तर तहसिलदार मॅडम आहेच.”

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. वर्षा देशपांडे म्हणाल्या, “बबनराव लोणीकर कुठल्याही पदावर निवडून आले असले आणि कोणत्याही पक्षाचे असले, तरी यांच्यातील पुरुषी प्रवृत्ती, बाईकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल नाही हाच याचा अर्थ आहे. त्यांनी लोकांना गोळा करण्यासाठी हे वक्तव्य केलं आहे. लोकांना जमा करण्यासाठी हिरोईन आणणे आणि त्यासाठी एका गॅझेटेड अधिकाऱ्याचा असा उल्लेख करणं हे निषेधार्ह आहे.”

गोपनियतेची आणि संविधानाची शपथ घेतलेल्या पदावरील माणसानं असं कलं, तर त्यांना या कारणासाठी अपात्र ठरवलं पाहिजे. यापुढील काळात कुठल्याही नेत्यानं महिलांबाबत असं वक्तव्यं केलं, तर आक्षेप घेऊन आणि निषेध करुन थांबायला नको. त्यांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही अशा प्रकारची समज मिळायला हवी. त्यामुळे महसूलविभागाच्या अधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यायला हवी. आम्ही याबद्दल सभापतींकडे तक्रार करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी करु, असंही वर्षा देशपांडे यांनी नमूद केलं.

व्हिडीओ:

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.