कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

कोरोनाचा फटका यंदाच्या 'आयफा' पुरस्कार सोहळ्यालाही बसला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

कोरोनाचा बॉलिवूडला विळखा, आयफा सोहळा पुढे ढकलला, वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार?

मुंबई : जगभरात कोरोनाची दहशत असताना त्याचा फटका (Corona Affect Bollywood) भारतीय सिनेसृष्टीलाही बसला आहे. कोरोना विषाणूच्या भीतीने अनेक सेलिब्रिटींनी सतर्कतेच्या दृष्टीने आपले कार्यक्रम रद्द केले आहेत. तर काहींना आपल्या सिनेमाचं शूटिंग रद्द करावं लागलं आहे. कोरोना व्हायरसमुळे भारतातल्या सिनेसृष्टीचंही कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. कोरोनाचा फटका यंदाच्या ‘आयफा’ पुरस्कार (IIFA Awards) सोहळ्यालाही बसला आहे.

मार्च महिनाच्या अखेरीस मध्यप्रदेशात हा पुरस्कार रंगणार (Corona Affect Bollywood) होता. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

दीपिकाची पॅरिस ट्रीप कॅन्सल

हेही वाचा : मुंबईची भाषा हिंदी, सब टीव्हीवरील ‘तारक मेहता’चा ‘उल्टा’ प्रताप, मनसेकडून सरळ करण्याचा इशारा

यंदाच्या पॅरिस फॅशन वीकला दीपिकाची खास हजेरी असणार होती. मात्र जगभरातली कोरोनाची दहशत पाहता दीपिकाने तिची ट्रीप कॅन्सल केली.

वरुण धवनचं विवाहस्थळ बदलणार

सिनेमांचं शूटिंगच नाही, तर सेलिब्रिटींच्या कौटुंबिक कार्यक्रमांवरही कोरोनाचा परिणाम होताना दिसतो आहे. अभिनेता वरुण धवन आणि गर्लफ्रेण्ड नताशा यावर्षी विवाह बंधनात अडकणार होते. थायलंडमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, आता हे विवाहस्थळ बदलल्याची चर्चा सुरु आहे.

‘गुड न्यूज’च्या हाँगकाँग रिलीजची तारीख बदलली

अभिनेता अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ हा चित्रपट हाँगकाँगमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.

टॉलिवूडलाही कोरोनाचा फटका

बॉलिवूडप्रमाणे टॉलिवूडलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. नागार्जूनच्या आगामी ‘वाईल्ड डॉग’ या सिनेमाचं शूटिंग थायलंडमध्ये होणार होतं. मात्र, खबरदारी म्हणून इथलं शूटिंग रद्द करण्यात आलं आहे.

कमल हसनच्या बहुप्रतिक्षित ‘इंडियन 2’ या सिनेमाचं चीनमध्ये होणारं चित्रीकरण आता इटलीमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. स्वत: कमल हसन यांनी ही सूचना दिली. चेन्नईमधलं शूटिंग संपल्यानंतर ही टीम पुढील शूटिंगसाठी इटलीला रवाना होणार आहे.

राम गोपाल वर्माच्या आगामी ‘एंटर द गर्ल ड्रॅगन’ या इंडो चायनीज फिल्मचं शूटिंगही रद्द करण्यात आलं. या सिनेमाचा काही भाग चीनमध्ये शूट होणार होता. मात्र, आता तीन महिने (Corona Affect Bollywood) या सिनेमाचं शूटिंग पुढे ढकललं आहे.

संबंधित बातम्या :

माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका, सुजय डहाकेच्या ‘ब्राह्मण अभिनेत्री’ वादावर शशांक केतकर आक्रमक

हिंदू-मुस्लिम एकतेवर रितेश देशमुखचा टिक टॉक व्हिडीओ

विवाहित पुरुषावर प्रेम करु नका, नीना गुप्तांचा तरुणींना सल्ला

‘सविता भाभी’ हद्दपार, ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाला कॉपीराईटचा फटका

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *