भारतात 'कोरोना'ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, 'कोरोना' कसा पसरतोय?

भारताचा कोरोना फैलाव दर अमेरिका-इटली या दोन पाश्चात्य देशांएवढा भयावह वाढला नसला तरी दुप्पट फैलाव सुरु होण्याच्या काही अंश अलिकडे आहे. (Corona Cases India comparison with other countries)

भारतात 'कोरोना'ग्रस्त तुलनेने कमी, मात्र फैलाव दर वाढता, 'कोरोना' कसा पसरतोय?

नवी दिल्ली : भारतातील ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 8 हजार 356 वर पोहोचली आहे. कालच्या दिवसभरात (11 एप्रिल) 909 नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. कालच्या दिवसात एकूण 34 कोरोनाबाधित रुग्ण दगावले असून एकूण 273 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. (Corona Cases India comparison with other countries)

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून 11 एप्रिलपर्यंत प्रत्येक देशात ‘कोरोना’च्या झालेल्या फैलावाचा आलेख तपासून पहिला जात आहे. भारतात ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची संख्या तुलनेने कमी असली, तरी कोरोनाचा फैलाव होण्याचा दर वाढता आहे, ही चिंतेची बाब आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या माजी सदस्य असणाऱ्या शमिका रवी यांनी मांडलेल्या आकडेवारीवर आधारित ही माहिती आहे.

देश – कोरोना फैलाव दर

अमेरिका – 17.9%
इटली – 17.15%
भारत – 13.38%
द. कोरिया – 12.27%
जपान – 11.49%

कोरोना फैलावाची कोणत्या देशात काय स्थिती

अ. भारत – कमी प्रमाण, पण फैलाव दर वाढत आहे
ब. जपान, दक्षिण कोरिया – कमी प्रमाण आणि फैलाव दर कमी होत चालला आहे
क. फ्रान्स, इटली, स्पेन – जास्त प्रमाण पण फैलाव दर मंदावत चालला आहे
ड. बेल्जियम, स्वीडन – जास्त प्रमाण आणि फैलाव दर वाढत आहे

अमेरिका -इटलीमध्ये काय स्थिती 

⦁ अमेरिका आणि इटली या देशांचा कोरोना फैलाव दर जास्त आहे. तिथे सध्या दर पाच दिवसांनी किंवा त्याही आधी कोरोनाचा फैलाव दुप्पट होतोय.
⦁ जपान आणि दक्षिण कोरिया या दोन पूर्व आशियाई देशांचे कोरोना फैलाव दर कमी असल्यानं नियंत्रणात आहेत.
⦁ भारताचा कोरोना फैलाव दर अमेरिका-इटली या दोन पाश्चात्य देशांएवढा भयावह वाढला नसला तरी दुप्पट फैलाव सुरु होण्याच्या काही अंश अलिकडे आहे. आपल्याला कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी हा फैलाव दर आणखी कमी करावा लागेल.
⦁ भारतात सध्या फैलाव दर 13.38% आहे. म्हणजेच कोरोनाचा फैलाव दर सात दिवसांनी दुप्पट या गतीने होत आहे.
⦁ भारताला कोरोनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर फैलाव दर आणखी कमी होणं आवश्यक आहे.

(Corona Cases India comparison with other countries)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *