Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा पार, दिवसभरात सर्वाधिक 3,041 नवे कोरोना रुग्ण

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली आहे.

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात 50 हजारांचा टप्पा पार, दिवसभरात सर्वाधिक 3,041 नवे कोरोना रुग्ण

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाचं थैमान (Corona Cases Maharashtra Latest Update) सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या 50 हजारांच्या पार गेली आहे. आज राज्यात नव्या 3 हजार 41 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली (Corona Cases Maharashtra Latest Update) आहे.

राज्यात आज दिवसभरात 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 33 हजार 988 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दिवसभरात राज्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 1 हजार 635 वर पोहोचला आहे. आज मृत्यू झालेल्यांपैकी मुंबईत 39, पुण्यात 6, सोलापूरात 6, औरंगाबादमध्ये 4, लातूरमध्ये 1, मीरा-भाईंदरमध्ये 1, ठाण्यात 1 मृत्यू झाला आहे (Corona Cases Maharashtra Latest Update).

राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वारंटाईनमध्ये

आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे प्रयोगशाळा नमूने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. तर 50 हजार 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Maharashtra Corona Cases Latest Update) आहेत.

मुंबई दिवसभरात 1 हजार 566 रुग्णांची वाढ

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 725 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 30 हजार 542 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 988 झाली आहे.

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 782 वर

पुणे शहरात आज दिवसभरात तब्बल 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबळींची संख्या आता 255 वर पोहोचली आहे. तर आज शहरात 179 नवीन बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 782 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 77 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 2,550 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात 1,977 अॅक्टिव्ह रुग्ण असून 176 क्रिटिकल आहेत. तर 47 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई84524558844899
पुणे (शहर+ग्रामीण)2814213406872
ठाणे (शहर+ग्रामीण)47935181561270
पालघर 74702965126
रायगड58402741106
रत्नागिरी71247127
सिंधुदुर्ग2461725
सातारा133776948
सांगली43025111
नाशिक (शहर +ग्रामीण)52162935225
अहमदनगर (शहर+ग्रामीण)58035715
धुळे124870462
जळगाव 42362420278
नंदूरबार 197839
सोलापूर32141692296
कोल्हापूर 92073212
औरंगाबाद65682788294
जालना71938024
हिंगोली 2942501
परभणी128834
लातूर 42522922
उस्मानाबाद 26418612
बीड142953
नांदेड 39424214
अकोला 1662119986
अमरावती 69045130
यवतमाळ 33823511
बुलडाणा 31816913
वाशिम 120823
नागपूर1719129615
वर्धा 17131
भंडारा91770
गोंदिया 1671042
चंद्रपूर110630
गडचिरोली73601
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)113025
एकूण2,06,6191,11,7408,822

Corona Cases Maharashtra Latest Update

संबंधित बातम्या :

Nagpur Corona | नागपुरात ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’ यशस्वी, जवळपास 75 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा वाढताच, एकाच दिवसात राज्यात 87 पोलीस पॉझिटिव्ह

Pune Corona | पुण्यात साडे सहा तासात 131 नवे रुग्ण

पुण्यात घाऊक औषध विक्रीसाठी दिवस ठरले, कोणत्या विभागात कधी विक्री?

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *