अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, न्युमोनियाचे निदान झालेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला (Corona Death Amravati) आहे.

अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी, न्युमोनियाचे निदान झालेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू
Follow us
| Updated on: Apr 04, 2020 | 9:47 AM

अमरावती : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Corona Death Amravati) आहेत. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. अमरावती शहरात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णाचा 2 एप्रिलला मृत्यू झाला असून आज सकाळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

हा रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला (Corona Death Amravati) होता. त्याला न्युमोनिया झाल्याचे खासगी डॉक्टरांना सांगितले होते. मात्र रुग्णाला श्वसनक्रियेत अडथळे येत होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र 2 एप्रिल रोजी या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या व्यक्तीचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट आज (4 एप्रिल) पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे अमरावतीत कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.

या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सुरु आहे. त्यांचेही स्वॅब आणि इतर प्रक्रिया सुरु आहे.

या मृत्यूनंतर अमरावती शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी दक्षतेचे पालन करावे. शक्यतो घराबाहेर पडू नये. ताप, खोकला आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. घाबरून न जाता दक्ष राहावे. आपल्यासह इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले (Corona Death Amravati) आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

  1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
  2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
  3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
  4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
  5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
  6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
  7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
  8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
  9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
  10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
  11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
  12. पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
  17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
  18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
  19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
  23. पुणे : 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
  24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
  25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
  26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
  27. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
  28. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल

राज्यात आतापर्यंत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे मुंबईतील आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 20 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर देशात कोरोनाबाधितांचा आकडा 3000 पार गेला आहे. जगात कोरोनामुळे 55 हजार मृत्यू झाले आहेत.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.