Corona | एक महिना व्हिसा नाही, मुंबई पोलिसांचं व्हिसा कामकाज एक महिना बंद

कोरोना विषाणुच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर (Corona Effect Visa Procedure) ही सेवा खंडित करण्यात आली आहे.

Corona | एक महिना व्हिसा नाही, मुंबई पोलिसांचं व्हिसा कामकाज एक महिना बंद

मुंबई : व्हिसा संदर्भातील मुंबई (Corona Effect Visa Procedure) पोलिसांची सेवा आजपासून पुढच्या एक महिन्यासाठी बंद करण्यात आली आहे. कोरोना विषाणुच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर(Corona Effect Visa Procedure) ही सेवा खंडित करण्यात आली आहे.

जी व्यक्ती व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करत असतात, त्यांना तसेच ज्यांना व्हिसा मिळाला आहे किंवा व्हिसाची मुदत वाढवून मिळाली आहे, त्यांना मुंबई पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी विभाग अर्थात एसबी 2 येथे माहिती द्यायची असते. तशी नोंद करायची असते. या ठिकाणी नोंदणी करण्यासाठी येणारे हे मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक असतात.

हेही वाचा : Corona Death India | देशात ‘कोरोना’चा चौथा बळी, पंजाबमध्ये एकाचा मृत्यू

सध्या कोरोना विषाणू जलदगतीने पसरत आहे. परदेशी (Corona Effect Visa Procedure)नागरिकांचा सतत या विभागात राबता असल्याने आता ही सेवा एक महिन्यासाठी खंडित करण्यात आली आहे. 15 एप्रिल पर्यंत ही सेवा बंद असणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करण्याबाबत केंद्र सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

कोरोनाचा हाहा:कार, देशात चौथा बळी

देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. पंजाबमध्ये गुरुवारी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे.

देशात कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

 • आंध्रप्रदेश – 1
 • दिल्ली – 12
 • हरियाणा – 17
 • कर्नाटक – 14
 • केरळ – 27
 • महाराष्ट्र – 49
 • ओडिशा -1
 • पुद्दुचेरी – 1
 • पंजाब – 2
 • राजस्थान 7
 • तामिळनाडू – 2
 • तेलंगाणा – 6
 • चंदीगढमधील केंद्रशासित प्रदेश – 1
 • जम्मू -काश्मीरमधील केंद्रशासित प्रदेश – 4
 • लडाख – 8
 • उत्तरप्रदेश -17
 • उत्तराखंड – 1
 • पश्चिम बंगाल – 1

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

 • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
 • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
 • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
 • पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
 • एकूण – 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Corona Effect Visa Procedure

संबंधित बातम्या :

‘कोरोना’च्या जनजागृतीसाठी बॉलिवूड गाण्याचे मॅशअॅप, रोहित पवारांकडून व्हिडीओ शेअर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे

PM MODI : 22 मार्चला ‘जनता कर्फ्यू’, सकाळी 7 ते रात्री 9 कोणीही घराबाहेर पडू नका : पंतप्रधान मोदी

Corona virus | आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, मुले आणि वृद्धांना घरी राहण्याचा सल्ला, मोदी सरकारचे मोठे निर्णय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *