Corona : नाशकात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात कोरोनाचा शिरकाव

कोरोना विषाणूने आता मालेगावातही शिरकाव केला आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे.

Corona : नाशकात कोरोनाचा पहिला बळी, मालेगावात कोरोनाचा शिरकाव
Follow us
| Updated on: Apr 10, 2020 | 4:26 PM

नाशिक : संपूर्ण देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने (Corona First Death In Nashik ) आता मालेगावातही शिरकाव केला आहे. मालेगाव शहरात कोरोना विषाणूमुळे पहिला बळी गेला आहे. येथे 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नाशिकच्या कोरोनाबाधितांची संख्या ही 7 वर पोहोचली आहे (Corona First Death In Nashik ).

मालेगावातील 6 जणांची कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 5 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळले, तर 1 कोरोना निगेटिव्ह आहे. या पाच जणांपैकी एकाचा काल मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत व्यक्ती ही 51 वर्षीय पुरुष असून ती मालेगांवातील रहिवाशी होती. ते दोन महिन्यांपूर्वी हज यात्रेला जाऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा कोविड-19 चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. काल बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालावली. सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली. मात्र, मृत्यूनंतर या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरलं आहे. तसेच, नाशकातील हा पहिला कोरोना (Corona First Death In Nashik ) बळी असल्याने चिंताही वाढली आहे.

राज्यात कोरोनाचे 1135 रुग्ण

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार माजवला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1,135 वर येऊन पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या 676 मुंबईत आहे. तर पुण्यात कोरोनाचे 155 रुग्ण आहेत. “एक जरी रुग्णाची संख्या वाढली, तरी ती आपल्या सर्वांच्या दृष्टीकोनातून काळजी करणारी गोष्ट आहे. 35 ते 40 दिवसाच्या काळात रुग्णांच्या आकडेवारीत एक मोठी उसळी पाहायला मिळते. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील 7 ते 8 दिवस आपले प्रयत्न सुरु राहतील. कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. मात्र, काही रुग्णांना उपचारानंतर घरीही सोडलं जात आहे. ही समाधानाची बाब आहे”, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च 2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) 3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च 4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च 5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च 7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च 8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च 9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च 11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च 12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल 17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल 18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल 19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल 24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल 25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल 26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल 27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल 28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल 31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल 33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल 37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल 38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 40. मुंबई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल 42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल 46. अंबरनाथ – एका रुग्णाचा मृत्यू – 6 एप्रिल 47. मुंबई – 41 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 48. मुंबई – 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 49. मुंबई – 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 50. मुंबई – 72 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 51. मुंबई – 30 वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू – 6 एप्रिल 52. मुंबई – 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 6 एप्रिल 53. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 54. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 55. पुणे – एका रुग्णाचा मृत्यू – 7 एप्रिल 56. नागपूर – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 57. मुंबई – 72 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 58. मुंबई – 48 वर्षीय महिलेचा मृत्यू – 7 एप्रिल 59. मुंबई – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 60. मुंबई – 67 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 7 एप्रिल 61. मुंबई – 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 62. मीरा भाईंदर – 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 63. मुंबई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 64. सातारा – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 7 एप्रिल 65. पुणे –  44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 66. पुणे – 55 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 67. नाशिक – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 68.  मुंबई – 59 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 69. कल्याण – 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 8 एप्रिल 70. मुंबई – 64 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 71. मुंबई – 46 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 72. मुंबई – 54 वर्षीय महिलेचा मृत्यू – 8 एप्रिल 73. रत्नागिरी – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल 74. पुणे- एकूण 14 रुग्णांचा मृत्यू- 9 एप्रिल 75. मुंबई – एकूण 9 रुग्णांचा मृत्यू – 9 एप्रिल 76. मालेगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 9 एप्रिल

Corona First Death In Nashik

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.