Corona Live : मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने होणाऱ्या विक्रीवर कारवाई

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Corona Live Important Updates

Corona Live : मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने होणाऱ्या विक्रीवर कारवाई
Picture

मुंबईत मास्क आणि हॅन्ड सॅनिटायझरच्या चढ्या दराने होणाऱ्या विक्रीवर कारवाई

28/03/2020,11:18AM
Picture

कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुणे-मुंबईवरुन येणाऱ्या गाड्या पोलिसांनी अडवल्या आहेत. गावी पोहोचण्यासाठी पुणे आणि मुंबईतले नागरिक मध्यरात्री घरातून बाहेर पडले.

28/03/2020,11:17AM
Picture

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असणाऱ्या 50 वर्षीय रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णाने कोणताही परदेश प्रवास केला नाही. डायबेटीस आणि फुफ्फुसाचा त्रास होत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

28/03/2020,9:08AM
Picture

मुंबईतील नायगाव बीडीडी चाळ क्रमांक दहाला आग

मुंबईतील नायगाव येथील बीडीड चाळ क्रमांक दहाला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी दहा अग्निशामक दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.

28/03/2020,9:03AM
Picture

नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला ड्रोन

नागपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासन ड्रोनच्या मदतीने शहरावर लक्ष ठेवत आहे. संचारबदीच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे.तसेच गर्दीच्या ठिकाणांवरही पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे लक्ष आहे.

28/03/2020,9:00AM
Picture

रत्नागिरीत संचारबंदीच्या काळात सागरी मार्गांनी येणाऱ्यांना रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन

रत्नागिरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीच्या काळात सागरी मार्गांनी येणाऱ्यांना रोखण्यासाठी विशेष अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. आता समुद्रात 24 तास गस्त घातली जाणार आहे. मत्स्यविभाग आणि बंदर खाते गस्त घालणार आहेत. गस्तीसाठी फिनोलेक्स कंपनीने विशेष बोट दिली आहे. जिल्हा बंदी असतानाही अनेकजण मुंबईतून बोटीच्या माध्यमातून गावाकडे येत आहेत.

28/03/2020,8:53AM
Picture

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पहिली टेस्ट निगेटिव्ह

पिंपरी चिंचवडमध्ये आज (28 मार्च) आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काल (27 मार्च) कोरोनामुक्त तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज या रुग्णांचे दुसरे नमुने अहवालासाठी पाठवले जाणार आहेत.

28/03/2020,8:06AM
Picture

उस्मानाबादमध्ये खते बी बियाणे दुकानं चालू ठेवण्यास परवानगी

उस्मानाबादमध्ये खते बी बियाणांची दुकानं चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत ही दुकानं उघडी राहणार आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी हे आदेश दिले आहेत.

28/03/2020,8:01AM
Picture

नाशिकमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांच्या गाड्या तीन महिन्यासाठी जप्त होणार

नाशिकमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांच्या गाड्या तीन महिन्यासाठी जप्त करण्यात येणार आहे, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. तर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील 100 हॉटेलला केवळ पार्सल सेवा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

28/03/2020,7:54AM
Picture

विरार हद्दीत पायीच घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा भीषण अपघात

विरार हद्दीत पायीच घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, तर एकाची प्रकृती चिंताजनक

28/03/2020,7:36AM
Picture

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पहिली टेस्ट निगेटिव्ह

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पहिली टेस्ट निगेटिव्ह, शुक्रवारी (27 मार्च) आधीच कोरोनामुक्त 3 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, आज या 5 रुग्णांचे दुसरे नमुने अहवालासाठी पाठवले जाणार

28/03/2020,7:32AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *