Corona LIVE : पुण्यात आणखी एक कोरोनाबळी, नगरच्या रुग्णाचा ससूनमध्ये मृत्यू

Corona LIVE : पुण्यात आणखी एक कोरोनाबळी, नगरच्या रुग्णाचा ससूनमध्ये मृत्यू
Picture

पुण्यात आणखी एक कोरोनाबळी, नगरच्या रुग्णाचा मृत्यू

10/04/2020,3:48PM
Picture

धुळे : आज मध्य रात्रीपासून धुळे जिल्ह्यात दीड दिवस सक्तीची संचारबंदी, मालेगाव मधील रुग्णाची संख्या पाहता जिल्ह्यात धोका टाळण्यासाठी संपूर्ण संचारबंदी, रात्री 12 पासून होणार संचार बंदी

10/04/2020,9:47AM
Picture

मुंबई : मुंबईच्या दादर परिसरात 3 नवे कोरोना रुग्ण, सुश्रूशा रुग्णालयातील दोन परिचारीकांना कोरोनाची लागण, केळकर रोड परिसरातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याची माहिती, दादरमध्ये आतापर्यंत 6 जणांना कोरोना

10/04/2020,9:24AM
Picture

रत्नागिरी : रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाला डिस्चार्ज, गुरुवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज, मूळचा शृंगारतळी गावचा असलेल्या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते

10/04/2020,9:18AM
Picture

नागपूर : विदर्भात एकाच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा उच्चांक, विदर्भात एकाच दिवशी 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 24 तासात अकोला 11, नागपूर 6 आणि बुलढाण्यात 5 कोरोना रुग्ण, विदर्भात वाढतोय कोरोना विषाणूंचा संसर्ग

10/04/2020,9:16AM
Picture

पुणे : विना मास्क फिरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, डिजीटल पास असून देखील मास्क न घातल्याने गुन्हा दाखल, सिंहगड पोलिसांकडून गुन्हा दाखल, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व नागरिकांना मास्क बंधनकारक, वडगाव पुलाजवळ दोन तरुण मास्क शिवाय फिरत असल्याने कारवाई

10/04/2020,8:59AM
Picture

नागपूर : काल सहा संशयितांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, कोरोनाबाधित 68 वर्षीय मृतकाच्या परिवारातील सहा जणांना कोरोनाची लागण, नागपुरात कोरोनाबाधितांचा आकडा 25 वर, नव्या सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आलं

10/04/2020,8:54AM
Picture

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रवेशद्वार पुढील आदेशापर्यंत बंद, विद्यापीठात शेकडो कर्मचारी आणि कुटुंब विद्यापीठ बाहेर ये-जा करतात, काही कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे विद्यापीठात कोरोना प्रसार होण्याची भीती, कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रादुर्भाव होण्याची भीती, दक्षतेच्या उपाय योजना म्हणून गुरुवारी रात्रीपासून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वार आणि खडकी गेट अनिश्चित काळापर्यंत बंद

10/04/2020,8:52AM
Picture

पुणे : मार्केट यार्डचा बाजार शुक्रवारपासून बेमुदत बंद, भुसार बाजार सुरु राहणार, बाजार समिती प्रशासनाचा निर्णय, फळे, भाजीपाला, कांदा बटाटा मार्केट बंद, अडते असोसिएशन, कामगार युनियन, तोलणार संघटना आणि टेम्पो संघटनेचा निर्णय, दहा एप्रिल पासून अनिश्चित काळापर्यंत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय, मार्केट यार्डच्या परिसरात विषाणूचा प्रसार वाढल्याने निर्णय

10/04/2020,8:51AM
Picture

नाशिक : मालेगावात आणखी पाच कोरोनाबाधित रुग्ण, त्यातील एक चांदवड येथील रहिवासी, नाशिकमध्ये आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 12 वर, एकाचा मृत्यू, मालेगावमध्ये एकूण 9 रुग्णांवर उपचार सुरु, तर नाशिक शहरात दोघांवर उपचार सुरु

10/04/2020,8:46AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *