Corona Live : राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल 1078 वर

कोरोना संबंधित दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेटेड बातम्या एका क्लिकवर

Corona Live : राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल 1078 वर
Picture

नगर : आरोपीच्या बाथरुममधे दारुचा साठा सापडला

#अहमदनगर – देशी-विदेशी अवैध दारुचा साठा जप्त, आरोपीच्या बाथरुममधे दारुचा साठा सापडला, अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तब्बल ८ लाख ५३ हजार ३९९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

08/04/2020,11:42AM
Picture

इंजिनिअरिंगच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर नाही

पुणे – इंजिनिअरिंगच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर नाही, वेळापत्रक जाहीर झाल्याच्या अफवा पसरत आहेत, मात्र या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पुणे विद्यापीठाचे आवाहन, कोरोनामुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा या 14 एप्रिलपर्यंत स्थगीत, नवं वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर करणार

08/04/2020,11:39AM
Picture

BMC कडून हॉटेल्समधील 10 हजार रुम ताब्यात

मुंबई महानगरपालिका हॉटेल्सच्या 10 हजार रुम ताब्यात घेणार, फाईव्ह स्टार हॉटेलपासून लॉजपर्यंतचा समावेश, कोरोना संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने अनेक रुम्स ताब्यात घेतल्या, संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी या रुम्सचा वापर करणार

08/04/2020,11:36AM
Picture

राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल 1078 वर

राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल 1078 वर, नव्या 60 रुग्णांची भर, मुंबईत 44, पुण्यात 9, अहमदनगर 1, नागपूर 4, अकोला 1, बुलडाणा 1

08/04/2020,11:13AM
Picture

राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या तब्बल 1078 वर

08/04/2020,11:32AM
Picture

बिंबसार नगरमधील कोरोनाबाधीत चार रुग्णांपैकी तिघांना डिस्चार्ज

मुंबई- बिंबिसार नगरमधील कोरोनाबाधीत चार रुग्णांपैकी तिघांना हिरानंदानी रुग्णालयातून डिस्चार्ज, एकाचा रिपोर्ट शनिवारी मिळणार

08/04/2020,11:02AM
Picture

आमदार संग्राम जगताप यांच्याकडून सात हजार गरजुंना घरपोच अन्न-धान्य

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात घरपोच सात हजार गरजू कुटुंबांना दिला किराणा माल, आमदार संग्राम जगताप यांच्याकडून गरजूंना दिलासा, प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून घरपोच किराणा केला पोहोच

08/04/2020,10:17AM
Picture

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारक पुन्हा संतप्त, घाटी रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे पीपीई किट पुरवल्याने संताप, डॉक्टर आणि परीचारकांना निकृष्ट साहित्य पुरवल्याचा नर्सेस फेडरेशनचा आरोप, निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा नर्सेस फेडरेशनने केला पर्दाफाश, अंगावर घालताच एप्रोन टराटर फाटले, तर निकृष्ट दर्जाचे मास्क, निकृष्ट दर्जाचे साहित्य बदलून दिले नाही, तर घाटीत कर्मचारी पुन्हा करणार काम बंद

08/04/2020,10:15AM
Picture

शिर्डी : 36 जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, प्रवरा मेडीकलच्या डॉक्टरांसह 36 जण निगेटिव्ह, प्रवरा परिसराला मोठा दिलासा, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्याने डॉक्टरसह स्टाफची चाचणी

08/04/2020,10:14AM
Picture

ठाण्याच्या मुरबाडमध्ये पोलिसांवर दुकानदारांचा जीवघेणा हल्ला

ठाणे : मुरबाड तालुक्यात पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकानदारांना दुकान लावताना सरकारी नियम पाळा, असं सांगायला गेलेल्या पोलिसांवर दुकानदारांचा जीवघेणा हल्ला

08/04/2020,10:10AM
Picture

नागपूर : नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काल एका गर्भवती महिलेचा मृत्यू, न्यूमोनियाने महिलेचा मृत्यू झाल्याने ती कोरोना संशयित होती का, याकडे लक्ष, प्रयोग शाळेत नमुने पाठविले, अहवाल येण्याची प्रतीक्षा

08/04/2020,10:08AM
Picture

नागपूर : लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या 11 वाहन चालकांवर एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयात आरोप पत्र दाखल केलं, लॉकडाऊन दरम्यान केलेल्या नाकाबंदी आणि पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली होती कारवाई, पोलिसांनी त्यांची वाहन जप्त करुन दंड आकाराला होता

08/04/2020,10:08AM
Picture

पुणे : येरवड्यातील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेवर तीन दिवसांनी महापालिका प्रशासनाकडून अंत्यसंस्कार, महिलेच्या कुटुंबातील इतर व्यक्तीही कोरोना बाधित असल्याने त्यांच्यांवर रुग्णालयात उपचार सुरु, त्यामुळे कोणीही नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले नाहीय

08/04/2020,10:05AM
Picture

नाशिक : लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर पोलीस आक्रमक, विनाकारण फिरणाऱ्यांना कायद्याचा दणका, 59 गुन्हे दाखल, 63 वाहने जप्त, इंदिरा नगर, गोविंद नगर भागात कारवाई

08/04/2020,10:04AM
Picture

जळगाव : बाजार समितीत सोशल डिस्टनसिंग आणि लॉकडाऊनचे तीन तेरा, भाजीपाला लिलावसाठी वाहने जवळजवळ उभी केल्याने लिलावादरम्यान मोठी गर्दी, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बाजार समिती प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याची गरज

08/04/2020,9:59AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *