Corona Live | विरारमध्ये बाप-लेकाला कोरोनाची लागण

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज आणि कोरोना अपडेट एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर. Corona updates live

Corona Live | विरारमध्ये बाप-लेकाला कोरोनाची लागण
Picture

विरारमध्ये बाप-लेकाला कोरोनाची लागण

विरार पश्चिम येथील एम बी इस्टेट परिसरात सोमवारी रात्री 2 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पिता पुत्राला कोरोनाची लागण झाली आहे. वसई तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 19 झाली आहे. विरार पश्चिम एम बी इस्टेट हा संपूर्ण परिसर महापालिकेने सील केला असून रुग्णाच्या नातेवाईकांना आयसोलेशन सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

07/04/2020,10:45AM
Picture

ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारताची नरमाई

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारताची नरमाई, अमेरिकेला हायड्रॉक्झिक्लोरोक्विन पुरवण्याचा भारताचा निर्णय, शेजारी देशांनाही हायड्रॉक्झिक्लोरोक्विन देणार

07/04/2020,10:38AM
Picture

मराठवाड्यात 15 हजार 286 जण होम क्वारंटाईन

औरंगाबाद : मराठवाड्यात 15 हजार 286 लोकांना केलं होम क्वारंटाईन. तर मराठवाड्यात एकूण 23 जणांना करोनाची लागण. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात कोरोनाची लागण. मराठवाड्यात 567 जणांवर कोरोना संशयित वार्डात उपचार सुरू, सर्वाधिक औरंगाबाद जिल्ह्यात 174 जणांवर उपचार सुरू

07/04/2020,10:36AM
Picture

विनाकारण फिरणाऱ्याना आव्हाडांची ताकीद

07/04/2020,10:35AM
Picture

.....तर प्रत्युत्तर देऊ, ट्रम्प यांचा भारताला इशारा

07/04/2020,10:34AM
Picture

पुण्यात कोरोनाचा विळखा वाढला, कोंढवा, महर्षी नगरसह 20 पेठांचा परिसर सील

07/04/2020,10:33AM
Picture

मुंबई-पुणे ते अमेरिका-फ्रान्स, 'कोरोना'ची ताजी स्थिती

07/04/2020,10:30AM
Picture

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 868, तर मृतांचा आकडा 52 वर

07/04/2020,10:29AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *