Corona : आपण कोरोना विषाणूच्या 'स्टेज थ्री'च्या उंबरठ्यावर, प्रदीप आवटेंचा इशारा

सध्याच्या परिस्थितीला आपण कोरोना (Corona Stage 3) विषाणूच्या 'स्टेज थ्री'च्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिला.

Corona : आपण कोरोना विषाणूच्या 'स्टेज थ्री'च्या उंबरठ्यावर, प्रदीप आवटेंचा इशारा

पुणे : राज्यात सध्या 220 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  (Corona Stage 3) आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे‌. त्याचबरोबर कोरोणामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. सोमवारी दुपारपर्यंत 39 रुग्ण घरी सोडण्यात आले. कोरोना रुग्णांच्या साधारण 20 टक्के रुग्ण डिस्चार्ज देऊन घरी गेलेत. तर 216 पैकी 40 टक्के रुग्णांना अत्यंत सौम्य अशी लक्षण आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीला आपण कोरोना (Corona Stage 3) विषाणूच्या ‘स्टेज थ्री’च्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे (Dr. Pradeep Awate) यांनी दिला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरुवातीला शहरी भागापर्यंत मर्यादित होता. मात्र, आता हे लोण ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मध्यपूर्व देशातील कामगार आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक परतत आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे”, असं आवटे यांनी सांगितलं.

“आपण सध्या कोरोना विषाणूच्या ‘स्टेज थ्री’ उंबरठ्यावर आहोत. मात्र, अजून आपण स्टेज थ्रीमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी लॉकडाऊन यशस्वी करणं गरजेच आहे. सरकार आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास हा विस्फोट रोखला जाईल”, असा विश्वास आवटे (Corona Stage 3) यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. राज्यात सध्या 11 हजारपेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालय समन्वय साधून आहोत. काही इमारतींचे रुग्णालयात रुपांतर करण्याचंही नियोजन झालंय. राज्यात एक हजार व्हेंटीलेशन उपलब्ध असून चार रुग्ण आयसीयुत असल्याचं आवटे यांनी सांगितलं.

कोरोना विषाणूवर सध्या कोणतेही औषध आणि लस उपलब्ध नाही. मात्र, या रुग्णांवर चिकनगुनिया, मलेरिया औषध आणि एचआयव्ही प्रतिरोधक औषधांचा वापर केला जातोय आणि या उपचार पद्धतीला (Corona Stage 3) यश मिळत असल्याचं आवटे यांनी सांगितलं.

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई434923741417
पुणे (शहर+ग्रामीण)7961938356
पिंपरी चिंचवड मनपा5023411
ठाणे (शहर+ग्रामीण)
50523693
नवी मुंबई मनपा30018074
कल्याण डोंबिवली मनपा14449127
उल्हासनगर मनपा4069
भिवंडी निजामपूर मनपा199117
मिरा भाईंदर मनपा76315730
पालघर 17113
वसई विरार मनपा102810531
रायगड673526
पनवेल मनपा56525
नाशिक (शहर +ग्रामीण)473210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)165368
धुळे17720
जळगाव 781174
नंदूरबार 374
सोलापूर10324185
सातारा564322
कोल्हापूर 60726
सांगली126294
सिंधुदुर्ग7820
रत्नागिरी31425
औरंगाबाद16531484
जालना1542
हिंगोली 19310
परभणी731
लातूर 12583
उस्मानाबाद 9132
बीड491
नांदेड 1356
अकोला 6471433
अमरावती 26116
यवतमाळ 148221
बुलडाणा 7483
वाशिम 80
नागपूर6358411
वर्धा 901
भंडारा3700
गोंदिया 6610
चंद्रपूर2710
गडचिरोली3900
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)63018
एकूण74860323292587

संबंधित बातम्या :

एक-दोन नव्हे, तब्बल पाच वर्षांसाठी वीज दरात मोठी कपात

देशात 1071 कोरोना रुग्ण, सामूहिक संसर्गाची स्थिती नाही, आतापर्यंत 99 रुग्ण बरे : आरोग्य मंत्रालय

महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांचा आकडा 220 वर, मुंबई-पुण्यात रुग्ण वाढतेच

Corona | कोल्हापुरात कोरोनाची एण्ट्री कशी झाली?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *