Corona Virus : जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

इटलीत एका 101 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली. मिस्टर पी, असं त्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे.

Corona Virus : जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 4:26 PM

मुंबई : जगभरात कोरोना (Corona Ten Interesting Things) विषाणूने थैमान घातलं आहे. त्यामुळे जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देश सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेना डब्ल्यूएचओने कोरोनाला संसर्गाने पसरणारा साथीचा आजार (Corona Ten Interesting Things) म्हणून घोषित केलं.

त्यामुळे देशातही सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच, जगभरात कधीही न घडलेल्या गोष्टी कोरोनामुळे घडत आहेत. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर अशाच काहीशा न घडलेल्या गोष्टी पहिल्यांदा घडत असल्याचे दिसत आहे.

1. इटलीत 101 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात

कोरोना विषाणू वृद्ध लोकांना सर्वाधिक टार्गेट करत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, इटलीत एका 101 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली. मिस्टर पी, असं त्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. इटलीतली परिस्थिती भीषण बनत चालली असली तरी मिस्टर पी यांना झालेला कोरोना पूर्णपणे बरा झाला आहे. शंभरी ओलांडलेल्या मिस्टर पी यांनी कोरोनाला मात दिल्यामुळे इटलीतल्या अनेक वृद्ध कोरोनाबाधितांचा आत्मविश्वास वाढला आहे.

2. विलगीकरण म्हणून चेन्नईच्या तरुणांचा झाडांवर निवारा

चेन्नईहून आपल्या मूळगावी परतलेले काही तरुण विलगीकरण म्हणून चक्क झाडांवर राहत आहेत. पुढचे 14 दिवस ते झाडांवरच राहून कोरोनापासून खबरादारी घेणार आहेत. चेन्न्ईहून हे तरुण पश्चिम बंगालच्या बालारामपूर या मूळगावी परतले. तरुण निरोगी असले तरी डॉक्टरांनी त्यांना घरच्या लोकांपासून 14 दिवस दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र, घर छोटं असल्यामुळे त्यांनी स्वतःहून झाडांवर राहण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे जे मुलं पुणे-मुंबईहून येऊनही सरार्सपणे बाहेर फिरत आहेत. त्यांनी या तरुणांचा आदर्श घेणं गरजेचं आहे.

3. लॉकडाऊनच्या काळात चीनमधलं प्रदूषण चमत्कारिकरित्या कमी

लॉकडाऊनच्या काळात चीनमधलं प्रदूषण चमत्कारिकरित्या कमी झालं आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासानं अवकाशातून टिपलेला चीनचा फोटो प्रसिद्ध केला. चीनमध्ये नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं. वाहतूक कमी झाल्यामुळे अमेरिकेतही कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात 10 टक्क्यांची घट नोंदवली गेली. शिवाय, मागच्या 10 वर्षात पहिल्यांदाच मुंबईचं अवकाशही निरभ्र झालं.

4. फ्रान्समध्ये एका हायस्पीड ट्रेनचं रुपांतर रुग्णवाहिकेत

फ्रान्समध्ये एका हायस्पीड ट्रेनचं रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात आलंय. कोरोनाबाधितांना तातडीचे उपचार मिळावेत, म्हणून त्यांना थेट ट्रेनद्वारे दवाखान्यात नेलं जातं. रुग्ण कोणत्याही भागातला असला तरी अगदी काही तासात त्यााला पॅरीसमधल्या रुग्णालयात आणण्यासाठी या हायस्पीड ट्रेनची मदत होते आहे. ट्रेनमध्येच रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवण्यात आले आहेत आणि मेडिकल उपकरणांसहीत सर्व सुविधाही ट्रेनमध्ये दिल्या गेल्या आहेत.

5. भारतीय सैन्य ३० तासात 8 लाख रुग्णांसाठी दवाखाना उभारु शकतं

वेळ पडलीच तर भारतीय सैन्य ३० तासात 8 लाख रुग्णांसाठी दवाखाना उभारु शकतं. अशी ग्वाही सैन्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दैनिक दिव्य मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली. दुर्गभ भागात जे कोरोनासंशयित आहेत, त्यांचे तपासणी नमुने भारतीय हवाई दलाच्या मदतीनं पोहोचवले जात आहेत. याशिवाय नौदल, हवाईदल आणि लष्कर ही तिन्ही सैन्यदल सज्ज असून काही तासांच्या अंतरावर देशातल्या कोणत्याही कोपऱ्यात आम्ही पोहोचू शकतो. असंही सैन्याकडून सांगण्यात आलं.

6. जगातल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा शोध लागल्याचे दावे

जगातल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा शोध लागल्याचे दावे केले जात आहेत. चीनमधल्या काही वृत्तपत्रांच्या दाव्यांनुसार, 57 वर्षी वेई गायक्सियन ही महिला जगातली पहिली कोरोनाबाधित व्यक्ती होती. मेडिकल टर्मनुसार एखाद्या साथीचा रोग पहिल्यांदा ज्या व्यक्तीला होतो, त्याला (Corona ten Interesting things) ‘पेशंट झिरो’ असं म्हटलं जातं. सध्या ती बरी झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित आहे. सदर महिला ही वुहानच्या मार्केटमध्ये मासे विक्री करते. मात्र, इतर काहींनी जगातला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण शोधणं शक्य नसल्याचा दावा केला आहे.

7. कोरोना विषाणूनं स्पेनच्या राजघराण्यातला पहिला बळी

कोरोना विषाणूनं स्पेनच्या राजघराण्यातला पहिला बळी घेतला आहे. स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचं वय 86 होतं. स्पेनचे राजे फेलिपे यांच्या त्या बहीण होत्या. दरम्यान, फेलिफे यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगात राजघराण्यातल्या एखाद्या व्यक्तीची मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. इतिहासात याआधी स्पेनच्या राजालाही स्पॅनिश फ्ल्यूची लागण झाल्याचा उल्लेख आहे. पहिलं महायुद्ध संपत असतानाच्या काळात आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूनं, जगाच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोकांना पछाडलं होतं.

8. कोरोना विषाणुळे आतापर्यंत 18 देशांमध्ये लॉकडाऊन

कोरोना विषाणुळे आतापर्यंत 18 देशांमध्ये लॉकडाऊन केलं गेलं आहे. तर एकूण 17 देशांनी सीमा सील करण्यात आल्या आहेत. जगभरातले अंदाजे 150 कोटी लोक लॉकडाऊनमुळे आपापल्या घरातच आहेत. म्हणजे जगात चीनहून जास्त लोकसंख्येचा पूर्ण देश घराबाहेर पडत नाही. इतर काही देशांनी पूर्ण देश बंद करण्याऐवजी शहरं बंद केली आहेत. काही ठिकाणी मर्यादित लॉकडाऊन आहे. तर काही ठिकाणी फक्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

9. कोरोनाविरोधात लढण्यासाठी रतन टाटांकडून 500 कोटी रुपयांची मदत

कोरोनाविरोधात लढण्यासाठी रतन टाटांनी तब्बल 500 कोटी रुपयांची मदत केली. कोरोनाविरोधात लढण्यासाठी इतकी मोठी रक्कम देणारे रतन टाटा हे बहुदा आशिया खंडातले पहिलेच उद्योजक आहेत. रतन टाटांबरोबरच अभिनेता अक्षय कुमारने 25 कोटी आणि बीसीसीसीआयने 51 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे सुपूर्द केली आहे. दरम्यान, स्थलांतरित होणाऱ्यांना केंद्र सरकारनं 29 हजार कोटींची मदत जाहीर केली.

10. जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये तब्बल 41 प्रकारच्या वेगवेगळ्या लसींचं परीक्षण सुरु

कोरोनाला थोपवण्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये तब्बल 41 प्रकारच्या वेगवेगळ्या लसींचं परीक्षण सुरु आहे. एखाद्या साथीविरोधात एकाचवेळी वेगवेगळ्या 41 लसींचं परीक्षण सुरु असण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीन, दक्षिण कोरिया, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये कोरोनाविरोधी लसीचं संशोधन अहोरात्र सुरु आहे. लसीचं सर्वात आधी परीक्षण प्राण्यांवर केलं जातं. त्यानंतर मानवी शरिराला लस दिली जाते. सध्या फक्त अमेरिकेनं माणसांना लस टोचून (Corona ten Interesting things) परीक्षण सुरु केलं आहे.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....