Corona | राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचना

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाबत घेतलल्या खबरदारीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray calls Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केलं आहे.

Corona | राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचना
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 2:32 PM

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाबत घेतलल्या खबरदारीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray calls Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केलं आहे. थोडा उशीर झाला, पण सरकारने योग्य पावलं उचलली आहेत, असं राज ठाकरे म्हणाले, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी नागरिकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलं. (Raj Thackeray calls Uddhav Thackeray)

राज ठाकरे म्हणाले, “पहिल्यांदा मी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन करतो. थोडा उशीर झाला, पण केंद्र आणि राज्य सरकारने योग्य पावलं उचलली आहेत. माझं मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं. आपल्याकडच्या सरकारी यंत्रणा, कर्मचारी, डॉक्टर, पोलीस, केंद्र आणि राज्य सरकारचा अभिनंदन करतो. थोडा उशीर झाला, पण सरकारने योग्य पावलं उचलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलणं केलं. सगळं बंद आहे पण डोमेस्टिक एरलाईन बंद करण्याची मागणी केली. त्यांनी करणार असल्याची माहिती दिली“.

मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, त्यांनाही काही सूचना केल्या आहेत. सरकार त्यांच्या परीने योग्य यंत्रणा राबवत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

ज्यांनी डॉक्टरवर हात उचलले त्यांना कळलं असेल की डॉक्टर किती महत्वाचे आहेत. त्यांना जाणीव झाली असेल की त्यांनी काय चूक केली. काही मूठभर लोकांना गंभीर्य कळत नाही. कालचा बंद झाला तो भारत बंद नव्हता ती टेस्ट केस होती. लोकांनी ऐकलं नाही तर सरकारला गंभीर पावलं उचलावी लागतील, असं राज ठाकरे म्हणाले.

दुसऱ्या दिवशीच वाहने रस्त्यावर दिसत आहेत. मुंबईतील मुलुंड चेक नाक्याला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. का करताय हे सगळं? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

परदेशी डॉक्टरांनी सांगितले की इटली, चीन, अमेरिकेची जी अवस्था झाली, तसं झाल्यास भारतात 50 टक्के लोकांना म्हंणजे 75 लाख लोकांना होऊ शकतो. इतका कोरोना पसरला तर यंत्रणा आपल्या आहेत का? काल थाळीनाद, घंटानादला लोक जत्थेच्या जत्थे बाहेर होते काय म्हणावं लोकांना? असं राज ठाकरे म्हणाले.

कोरोना आधीच मागे लागलाय. हात जोडून विनंती आहे की प्रकरण सहज घेऊ नका. 31 तारीख सरकारने सांगितली असली तरी लोक ऐकत नाहीत, त्यामुळे जमावबंदीची तारीख आणखी पुढे जाऊ शकते. हातावरच्या पोटाच्या लोकांनाही थोडी कळ सोसावी लागेल. जर युद्ध झालं असतं तर काय केलं असतं? सध्या आपण कोरोना विषाणूशी लढा देत आहोत, ते सुद्ध एकप्रकारचं युद्धच आहे, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं.

सरकारलाही कदाचित माहीत नसेल की आकडा नेमका किती असेल. घरी बसलो की बाहेरचे रुग्ण शोधणे सरकारलाही सोपे जाईल. हात जोडून विनंती की घरी बसा, आपल्यासाठीच सगळं सुरू आहे. डॉक्टर, जीवावर उदार होऊन बाहेर आहेत. डॉक्टर, पोलीस यांनाही परिवार आहे. पोलिसांशी हुज्जत घालतात लोक, त्यांना शरम नाही वाटत.

लोकांना जाणीव आहे. पण मूठभर लोकांना विनंती आहे की पुढे असं काही करू नका. जर समज येत नसेल तर पोलिसांना कायदा कठोर करावा लागेल.

कंपन्यांनी मदत करावी

कंपन्यांना मदत करावी लागेल, त्यांनी कामगारांचे पगार कापू नयेत . हातावरच्या पोट असेलल्यांनाही मदत करावी. रेस्टरन्ट बंद करा पण किचन सुरू ठेवा. मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे , स्टॅम्प मारलेली लोक बाहेर पडत आहे त्यांनाही गंभीर्य नाही.

संबंधित बातम्या

दहा दिवस पुरेसाच रक्तसाठा, अंतर राखून रक्तदान करा, राजेश टोपेंची कळकळीची विनंती

Lock Down | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर गर्दी, पोलिसांनी मार्ग रोखला  

Corona | वेल्हा परिसरातील तब्बल 26 गावं क्वारंटाईन, महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.