मुंबईत गर्दीच्या बाजारपेठा आलटून-पालटून सुरु, कोणती दुकानं कधी बंद?

मुंबई महापालिका मुख्यालय आणि पालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अंशत: प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. (Corona Virus effect on Mumbai Market)

मुंबईत गर्दीच्या बाजारपेठा आलटून-पालटून सुरु, कोणती दुकानं कधी बंद?
Follow us
| Updated on: Mar 19, 2020 | 10:09 AM

मुंबई : कोरोनाचा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये धीम्या गतीने प्रसार होत आहे. मात्र तो वाढू नये, यासाठी राज्य सरकारकडून काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. गर्दी होणाऱ्या बाजारपेठा रोटेशन पद्धतीने म्हणजेच आलटून-पालटून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Corona Virus effect on Mumbai Market)

मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी विभागीय आयुक्तांना आपापल्या वॉर्डामधल्या अशा बाजारपेठांची यादी आणि त्या कधी बंद ठेवता येतील, याचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. रस्त्यांनुसार त्यावरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर माहीम मधील काही भाग बंद आहे

मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी बंद राहणारी दुकानं

दादर 1) एन. सी. केळकर मार्ग (पश्चिम बाजू) 2) एम. सी. जवळे रोड भवानी शंकर म्युनिसिपल शाळेपर्यंत 3) एम. जी. रानडे रोड 4) एस. के. बोले मार्ग (उत्तर बाजू)

माहीम 1) टी. एच. कटारिया रोड (उत्तर बाजू) (गंगा विहार हॉटेल ते शोभा हॉटेलपर्यंत) 2) एल. जे. क्रॉस रोड (दर्गाह गल्ली)

धारावी 1) 90 फूट रोड (पूर्व बाजू) आणि 60 फुटी रोड ते संत रोहिदास रोड 2) आंध्र व्हॅली रोड (पूर्व बाजू) 3) एम. जी. रोड (पूर्व बाजू)

(Corona Virus effect on Mumbai Market)

दरम्यान, मुंबई महापालिका मुख्यालय आणि पालिकेच्या इतर कार्यालयांमध्येही अंशत: प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. महापालिका मुख्यालय, वॉर्ड ऑफिस, खाते कार्यालय या ठिकाणी देण्यात येणारी प्रवेशपत्रे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आली आहेत.

निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपनीवर कारवाई

महापौर, उपमहापौर, आयुक्त यांना बाहेरुन येणाऱ्या केवळ 10 व्यक्ती भेटू शकणार, तर अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, समिती अध्यक्ष, उपायुक्त, खातेप्रमुख यांना बाहेरील केवळ 5 व्यक्तीच भेटू शकणार. इन्फ्रारेड थर्मामिटरच्या माध्यमातून शारीरिक तापमान तपासल्यानंतरच आत प्रवेश देण्यात येईल.

पुढील काही दिवस कार्यालयीन टपाल बंद करण्यात येत आहे. केवळ ई-मेलद्वारे स्वीकारल्या जातील. महापालिकेत कोणतेही अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या खाजगी संपर्कातील व्यक्तींना येण्यास मनाई आहे. लोकांच्या तक्रारी, सूचनांचा आढावा टपालाद्वारे स्वीकारला जाईल. त्याची वेगळी व्यवस्था प्रवेशद्वारावर असेल. तर बैठका, निर्णय, कर्मचारी, अधिकारी यांना सूचना द्यायच्या असल्यास दूरध्वनीवरुन दिल्या जातील.

कोरोनाग्रस्तांचा आकडा किती?:

Corona Virus effect on Mumbai Market

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.