‘कोरोना’ संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद, नितीन गडकरींकडून मोठा दिलासा

तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी टोलवसुली रद्द करण्यात आली आहे (Nitin Gadkari suspends Toll Collection)

'कोरोना' संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद, नितीन गडकरींकडून मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 7:34 AM

नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या संकटामुळे देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही दिलासादायक घोषणा केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके बंद राहतील. (Nitin Gadkari suspends Toll Collection)

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजेच 14 एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली होणार नाही

तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी देशभरातली टोलवसुली रद्द करण्यात आली आहे. ‘रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहील’ असं गडकरींनी स्पष्ट केलं.

संचारबंदी लागू झाल्यामुळे कोणालाही विनाकारण वाहनाने प्रवास करता येत नाही. अत्यावश्यक सेवा बजावणारे कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने, वैद्यकीय कारणास्तव होणारी वाहतूक यासाठीच प्रवासाला परवानगी आहे.

विशेष म्हणजे खाजगी वाहनात चालक अधिक दोन, तर रिक्षामध्ये चालक अधिक एक इतक्याच प्रवाशांना राज्य सरकारने संमती दिली आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 606 वर पोहोचली असून त्यामध्ये 43 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

महाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकलं होतं, कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकण्याचा प्रयत्न असेल, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.

Nitin Gadkari suspends Toll Collection

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.