Corona : 'मद्यपान केल्याने कोरोना होत नाही', अफवेने इराणमधील 600 जणांचा मृत्यू, 3000 जण रुग्णालयात

मद्यपान केल्याने कोरोना होत नाही अशी अफवा पसरली होती. त्यामुळे अनेकांनी कोरोना होऊ नये म्हणून मद्यपान केले.

Corona : 'मद्यपान केल्याने कोरोना होत नाही', अफवेने इराणमधील 600 जणांचा मृत्यू, 3000 जण रुग्णालयात

तेहराण : इराणच्या मध्य पूर्व क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Virus In Iran) सर्वाधिक आहे. अचानकपणे हा विषाणू इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरल्याने काही लोकांनी या कोरोना विषाणूवर उपचार शोधण्याचा प्रयत्न केला. मद्यपान केल्याने कोरोना होत नाही अशी अफवा पसरली होती. त्यामुळे अनेकांनी कोरोना होऊ नये म्हणून मद्यपान केले. त्यामुळे इराणमध्ये 600 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3000 जणांची तब्येत खराब झाली आहे. मद्यपान केल्याने कोरोना होत नाही अशी अफवा इराणच्या (Corona Virus In Iran) नागरिकांमध्ये पसरली होती, त्यामुळे हे सर्व घडलं.

दारुचं सेवन करणे हे कोरोना विषाणूवरील उपचार नाही, तर हे त्यापेक्षा जास्त घातक आहे. यामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आमच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे”, इराणचे न्यायिक प्रवक्ते घोलम होसैन एसमेली (Gholam Hossein Esmeli) यांनी मंगळवारी सांगितलं. “नागरिकांना मृत्यू आणि हानी पोहोचवण्यासाठी त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी त्यांनाच जबाबदार धरावे”, असंही ते म्हणाले. तसेच, याप्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा : भारताने हनुमानाप्रमाणे संजीवनी द्यावी, ब्राझीलच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र

आतापर्यंत कोरोना विषाणूवर कुठलाही उपचार किंवा लस उपलब्ध झालेली नाही. फक्त काही अशा मोजक्या औषधी उपलब्ध आहेत ज्यामुळे कोरोनाच्या सुरुवातीची लक्षणं कमी करण्यात मदत करतात.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भानंतर इराणच्या संसदेने (Corona Virus In Iran) मंगळवारी पहिली बैठक घेतली. यामध्ये विधानसभेच्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त, 290 सभासदांनी हजेरी लावली. मात्र, या बैठकिला ज्येष्ठ राजकारणी आणि वक्ते अली लारीजानी (Ali Larijani) हे अनुपस्थित होते. त्यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

इराणच्या संसदेतील जवळपास 31 सदस्यांना कोरोनातची लागण झाली आहे. तसेच, कोरोना विषाणूच्या केसेस पुढे आल्यानंतर संसदेला बंद करण्यात आलं होतं.

इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे 62,589 लोकांना संसर्ग झाला आहे आणि जवळपास 3,872 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, इराणवर हे आरोप लावले जात आहेत की ते मृतांचा आकडा कमी दाखवत आहेत.

जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा हा 1,431,900 वर पोहोचला आहे. तर जगभरात आतापर्यंत 82,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू (Corona Virus In Iran) झाला आहे.

संबंधित बातम्या :

‘नरेंद्र मोदी ग्रेट!’ डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बदलली, भारताने निर्यातबंदी उठवताच नरमाई

‘WHO’ला चीनचा पुळका, तुमचा निधीच रोखतो, डोनाल्ड ट्रम्प यांची अरेरावी

अमेरिकेत एकाच दिवशी ‘कोरोना’चे दोन हजार बळी, वुहानमधील लॉकडाऊन 76 दिवसांनी हटवला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *