Corona LIVE : कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Corona LIVE : कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Picture

25/03/2020,1:02PM
Picture

25/03/2020,1:01PM
Picture

ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वत:हून पुढे येत आहे. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना विनंती आहे की हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

25/03/2020,1:00PM
Picture

25/03/2020,12:56PM
Picture

25/03/2020,12:51PM
Picture

कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे, हे जागतिक युद्ध आहे, शत्रू लपून छपून वार करतो, तसंच कोरोना लपून-छपून येतोय, तुम्ही घरी राहून या शत्रूला हरवू शकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

25/03/2020,12:50PM
Picture

25/03/2020,12:48PM
Picture

25/03/2020,11:13AM
Picture

25/03/2020,11:07AM
Picture

सांगली : सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या 9 वर, इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण, आधी चौघांना त्यानंतर आज आणखी पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 113 वर

25/03/2020,11:02AM
Picture

ठाणे : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आनंदनगर जकात नाका येथे वाहन धारकांना पोलिसांनी उठा-बषा काढून दिला काठीचा प्रसाद, समजावून सांगून देखील नागरिक समजत नसल्याने लाठीचार्जचा शेवटचा पर्याय, संचार बंदी लागून असताना देखील नागरिक विना कारण घराबाहेर पडत आहे.

25/03/2020,10:03AM
Picture

पुणे : पुणे जिल्ह्यात आता खाजगी वाहनांना पेट्रोल आणि डिझेल देण्यास मनाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खाजगी वाहनास पेट्रोल-डिझेल देण्यास मनाई, दुचाकी तीनचाकी चारचाकी वाहनांना पेट्रोल भरण्यास मनाई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश

25/03/2020,9:20AM
Picture

पुणे : 10 मार्च रोजी ॲडमिट केलेल्या दोन रुग्णांचा चौदा दिवसांचा कालावधी काल संपला, 14 दिवसानंतरचा पहिला पाठवलेला एनआयव्ही अहवाल निगेटिव्ह, त्यामुळे आज त्यांची दुसरी चाचणी एनआयव्ही पाठविली जाणार आहे, ही चाचणी सुद्धा निगेटिव्ह अपेक्षित आहे, चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांनाही घरी सोडलं जाणार आहे

25/03/2020,9:19AM
Picture

पुणे : कोरोनाच्या प्रकोपामुळे केंद्रीय विद्यालयाचा मोठा निर्णय, 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करणार

25/03/2020,9:08AM
Picture

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर कोरोना विषाणूबाबत गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं, संचारबंदीच्या नियमाचा 86 जणांकडून भंग, त्यानुसार शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कलम 188 नुसार गुन्हे दाखल

25/03/2020,8:59AM
Picture

नाशिक : गुढीपाडव्या निमित्त निघणाऱ्या सर्व शोभायात्रा आज रद्द, दरवर्षी गजबजणाऱ्या रस्त्यांवर आज शुकशुकाट, इतिहासात पहिल्यांदाच गुढी पाडव्याला जुन्या नाशकात चिटपाखरुही नाही, मात्र घराघरात उभारल्या जाताहेत गुढ्या

25/03/2020,8:48AM
Picture

पुणे : नरेंद्र मोदींच्या लॉडाऊनच्या आवाहनानंतर शहरात शुकशुकाट, अत्यावश्यक सेवा मात्र सुरु, भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी, चौकाचौकात पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त, नागरिकांनी घराबाहेर पडू नये प्रशासनाकडून आवाहन

25/03/2020,8:46AM
Picture

औरंगाबाद : औरंगाबादच्या भाजी मंडईत नागरिकांची जीवघेणी गर्दी, भाजीपाला खरेदीविक्रीसाठी हजारो नागरिकांची तुंबळ गर्दी, औरंगाबादच्या जाधववाडी भाजी मंडईतील प्रकार, जमावबंदी, संचारबंदी धाब्यावर बसवून तुफान गर्दी, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचं गर्दीकडे अक्षम्य दुर्लक्ष, नागरिकांच्या जीवघेण्या गर्दीमुळे कोरोनाचे संकट वाढण्याची भीती

25/03/2020,8:44AM
Picture

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात अंधश्रद्धेची धक्कादायक घटना, कोरोना जातो म्हणून लिंबाच्या झाडाखाली पेटवले दिवे, औरंगाबाद शहरातील जय गजानन नगर परिसरातली घटना, गेल्या तीन दिवसांपासून पेटवले जात आहेत दिवे, जय गजानन नगरातील महिलांनी लावले लिंबाच्या झाडाखाली दिवे, लिंबाच्या झाडाखाली दिवे लावल्याने करोना जात असल्याची अफवा

25/03/2020,8:40AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *