रॉबर्ट वाड्रांना जायचं लंडनाला, कोर्टाकडून परवानगी अमेरिका, नेदरलँडला 

नवी दिल्‍ली: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाने रॉबर्ट वाड्रांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, वाड्रांची लंडनला जाण्याची मागणी फेटाळली आहे. वाड्रा यांनी आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ईडीने (ED) याला विरोध केला. त्यावर न्यायालयाने वाड्रांना अमेरिका आणि नेदरलँडचा पर्याय दिला. रॉबर्ट वाड्रा यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा आहे. त्यामुळे वाड्रा यांनी न्यायालयात वैद्यकीय …

रॉबर्ट वाड्रांना जायचं लंडनाला, कोर्टाकडून परवानगी अमेरिका, नेदरलँडला 

नवी दिल्‍ली: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयाने रॉबर्ट वाड्रांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, वाड्रांची लंडनला जाण्याची मागणी फेटाळली आहे. वाड्रा यांनी आजारी असल्याचे सांगत उपचारासाठी लंडनला जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र, ईडीने (ED) याला विरोध केला. त्यावर न्यायालयाने वाड्रांना अमेरिका आणि नेदरलँडचा पर्याय दिला.

रॉबर्ट वाड्रा यांचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा आहे. त्यामुळे वाड्रा यांनी न्यायालयात वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत उपचारासाठी पासपोर्ट देण्याची विनंती केली होती. ईडीने रॉबर्ट वाड्रांच्या या मागणीचा विरोध केला होता. यावेळी ईडीने वाड्रा यांच्याविरोधातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील संपत्ती आणि पुरावे लंडनमध्ये असल्याचे सांगितले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाड्रांना लंडनला जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. तसेच अमेरिका आणि नेदरलँड येथे उपचारासाठी 6 आठवड्यांची परवानगी दिली.

परदेशात जाण्यासाठी घातलेल्या अटी –

  1. परदेशात जेथे राहणार तेथील पत्ता आणि फोन नंबर द्यावा लागणार.
  2. 25 लाखांची बँक गॅरंटी जमा करावी लागेल.
  3. परदेशातून आल्यानंतर 24 तासात माहिती द्यावी लागेल.
  4. दरम्यानच्या काळात पुरावे नष्ट करणे अथवा साक्षीदारांना प्रभावित करायचे नाही.
  5. परत आल्यावर 72 तासांमध्ये तपास अधिकाऱ्यांकडे जाऊन तपासत सहभागी व्हावे लागेल.

काय आहे प्रकरण?

ईडीने रॉबर्ट वाड्रांवर मनी लान्ड्रिंगद्वारे लंडनच्या 12 ब्रायनस्टन स्क्वेअरमध्ये 19 लाख पाउंड किमतीची बेनामी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप केला आहे. ही संपत्ती रॉबर्ट वाड्रांच्या नावावर असल्याचाही आरोप ईडीने केला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *