शिवसेना आमदारांकडूनच सोशल डिस्टन्सिंग फज्जा, संतोष बांगर यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा

हिंगोलीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर 50 जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

शिवसेना आमदारांकडूनच सोशल डिस्टन्सिंग फज्जा, संतोष बांगर यांच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा

हिंगोली : औंढानागनाथ पालखी सोहळ्याप्रकरणी शिवसेनेच्या आमदारासह 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हिंगोलीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याप्रकरणी औंढानागनाथ पोलिसांत कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन 2005, 51 ब अंतर्गत हे गुन्हे दाखल नोंदवण्यात आले आहेत. कोरोनामुळं दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर होणारा तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ प्रभूंचा पालखी सोहळा रद्द होणार असल्याची चर्चा होती. पण ऐनवेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांसह पालखी काढली. (Crime against 50 people including Shiv Sena MLAs)

या पालखीमध्ये हजारो भाविक दाखल झाले असून, सोशल डिन्स्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला आहे. त्यामुळे हिंगोलीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर 50 जणांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथील श्रीनागनाथ प्रभूंना पालखीतून फिरवले जाते. नागनाथ मंदिरातून नागनाथांची बहीण महाकाली यांचा झेंडा घेऊन पालखी मार्गस्थ होत असते. दरवर्षी या पालखीमध्ये मानकरी, भजनी मंडळ, विश्वस्त वाजंत्री , पंचक्रोशीतील भक्तांची मोठी उपस्थिती असते. मंदिरातून निघालेली ही पालखी बाजारातून कालिका मातेचे दर्शन घेतल्यानंतर सीमोल्लंघन करत सोने लुटण्यासाठी मार्गस्थ होत असते. पालखी काढल्याप्रकरणी विद्यमान आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर 50 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *