बिल्डरकडून ठरलेल्या वेळेत घराचा ताबा न मिळाल्यास बँक पैसे देणार, SBI ची नवी योजना

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे घर खरेदी करण्याचे स्वप्न असते. काही लोक स्वत:च्या स्वप्नातील घर बूकही करतात आणि अर्ध्यापेक्षा जास्त पैसे बिल्डरला देतात (customer will get refund). मात्र अचानक त्यांनी घर बूक केलेल्या प्रकल्पाचे बांधकाम रखडते आणि घरासाठी ताटकळत उभे राहावे लागते. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. ठरलेल्या वेळेत बिल्डरने घराचा ताबा दिला …

बिल्डरकडून ठरलेल्या वेळेत घराचा ताबा न मिळाल्यास बँक पैसे देणार, SBI ची नवी योजना

नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीचे स्वत:चे घर खरेदी करण्याचे स्वप्न असते. काही लोक स्वत:च्या स्वप्नातील घर बूकही करतात आणि अर्ध्यापेक्षा जास्त पैसे बिल्डरला देतात (customer will get refund). मात्र अचानक त्यांनी घर बूक केलेल्या प्रकल्पाचे बांधकाम रखडते आणि घरासाठी ताटकळत उभे राहावे लागते. मात्र, आता काळजी करण्याची गरज नाही. ठरलेल्या वेळेत बिल्डरने घराचा ताबा दिला नाही तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ग्राहकांना पैसे परत करणार आहे. याबाबत एसबीआयने तशी नवी (customer will get refund) योजना आणली आहे.

सध्या बांधकाम क्षेत्रात म्हणजेच रिअल इस्टेट सेक्टरमध्ये प्रचंड मंदी आहे. या क्षेत्राला बळकटी यावी यासाठी एसबीआयने एक आगळीवेगळी योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत घर खरेदी करणाऱ्याला ठरलेल्या वेळेत बिल्डरने घराचा ताबा न दिल्यास ग्राहकाला बँक होम लोनचे पैसे परत करणार आहे. बिल्डरला ऑक्यूपेशन सर्टिफिकेट (ओसी) मिळत नाही तोपर्यंत ही रिफंड स्कीम लागू राहील.

‘रेसिडेंशल बिल्डर फायनान्स विथ बायर गॅरंटी’ असे या योजनेचे नाव आहे. या स्कीमच्या अंतर्गत ग्राहकांना 2.5 कोटी रुपयांपर्यंत घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज मिळेल. याशिवाय बँकेच्या नियमांचे पालन करणाऱ्या बिल्डरलादेखील या योजनेअंतर्गत 50 कोटी ते 400 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

“या योजनेचा बांधकाम क्षेत्राला फायदा होईल. याशिवाय घर खरेदी केल्यानंतर काही बिल्डर ठरलेल्या वेळेत घराचा ताबा ग्राहकांना देत नाहीत, त्यामुळे लोकांचे पैसे अडकतात. अशा लोकांसाठी देखील ही स्कीम महत्त्वाची आहे”, अशी प्रतिक्रिया एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी दिली. “ग्राहकांचे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर आहे”, असेदेखील ते म्हणाले. या योजनेअंतर्गत एसबीआयने नुकतेच मुंबईच्या सनटेक डेव्हलोपर्ससोबत तीन प्रकल्पांचा करार केला आहे.

‘एखाद्या ग्राहकाने 2 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला. यापैकी 1 कोटी रुपये त्याने बिल्डरला दिले. यादरम्यान, अचानक प्रकल्पाचे बांधकाम बंद झाले तर बँक त्याला 1 कोटी रुपयांचा रिफंड देईल’, असे रजनीश कुमार यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *