Corona | सुरतमध्ये डी मार्टच्या एक्झिक्युटिव्हला कोरोना, 1,498 ग्राहक होम क्वारंटाईनमध्ये

सुरतच्या पांडेसरा-बमरोली रोडवरील डी-मार्ट स्टोअरच्या पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये कामाला असलेल्या एका 22 वर्षीय  एक्झिक्युटिव्हला कोरोनाची लागन झाली आहे.

Corona | सुरतमध्ये डी मार्टच्या एक्झिक्युटिव्हला कोरोना, 1,498 ग्राहक होम क्वारंटाईनमध्ये

सुरत : गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण (D-Mart Employee Corona Positive) हे अहमदाबादेत आहेत. मात्र, आता येथे समुह संसर्गाचं नवीन प्रकरण समोर आलं आहे. यामुळे तब्बल 1,493 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 1 एप्रिलला गुजरातच्या सुरतमधून हा (D-Mart Employee Corona Positive) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुरतच्या पांडेसरा-बमरोली रोडवरील डी-मार्ट स्टोअरच्या पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये कामाला असलेल्या एका 22 वर्षीय  एक्झिक्युटिव्हला कोरोनाची लागन झाली आहे. तो कामगार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. तसेच, या कामगाराचा कुठलाही परदेशी प्रवासाचा अहवाल नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यासोबतच सुरतमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 वर पोहोचला आहे. या कामगाराला सध्या न्यू सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या कामगाराला कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसां डी-मार्टमध्ये आलेल्या 1,493 ग्राहकांना तसेच, हे डी-मार्ट जिथे आहे तेथील 1,569 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. या सर्व नागरिकांना पालिकेने विशेष मेसेजिंग सिस्टिमच्या माध्यमातून आवश्यक निर्देश दिले जात आहेत. तसेच, पांडेसरा येथील हे डी-मार्ट बंद करण्यात आलं आहे (D-Mart Employee Corona Positive).

पालिका आयुक्तांनी सुरतमधील इतर दुकानदारांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत. डी-मार्टच्या या कर्मचाऱ्याला परदेश यात्रा न करता कोरोना पॉझिटिव्ह होणं चिंताजनक आहे.

ग्रोसरी स्टोअर्सला प्रशासनाने अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट केलं आहे. तिथे लोक आवश्यक सामान घेण्यासाठी जातात. शहरातील ज्या दुकानांची यादी प्रशासनाने जारी केली आहे त्यामध्ये डी-मार्टचंही नाव आहे.

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची व्याप्ती वाढली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा साडेतीनशेच्या दिशेने वाटचाल करत आहे.  मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, अहमदनगर, बुलडाणा या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्यात दोन, तर बुलडाण्यात एकाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 16 जणांना ‘कोरोना’मुळे प्राण गमवावे लागले आहेत.

महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?

मुंबई – 181
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
नवी मुंबई – 13
कल्याण – 10
ठाणे – 8
वसई विरार – 6
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
अहमदनगर – 8
बुलडाणा – 5
यवतमाळ – 4
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
नाशिक – 1
जळगाव- 1
इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 341

D-Mart Employee Corona Positive

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *