दादरमध्ये 'कोरोना'चे तीन नवे रुग्ण, दोन नर्सना लागण, धारावीत आणखी पाच कोरोनाग्रस्त सापडले

दादरच्या रुग्णालयातील 27 वर्षीय आणि 42 वर्षीय परिचारिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. (Dadar Hospital Nurses Dharavi Corona Patients)

दादरमध्ये 'कोरोना'चे तीन नवे रुग्ण, दोन नर्सना लागण, धारावीत आणखी पाच कोरोनाग्रस्त सापडले

मुंबई : मुंबईतील दादरमध्ये ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यात एका हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे. तर 80 वर्षीय वृद्धालाही ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तर धारावीतही कोरोनाचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. (Dadar Hospital Nurses Dharavi Corona Patients)

दादरच्या रुग्णालयातील 27 वर्षीय आणि 42 वर्षीय परिचारिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आलं आहे. तर 80 वर्षीय वृद्धालाही ‘कोरोना’ झाल्याचे समोर आले आहे. आता दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे.

धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळल्याने धारावीतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्यापैकीदोघे जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या तबलिगींची पोलिसांनी यादी काढली होती. त्यामुळे दोघेही आधीपासूनच क्वारंटाइन होते.

हेही वाचामुंबई मनपाचं मिशन धारावी, प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार, तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या

धारावीत सापडलेल्या पाच रुग्णांपैकी एक महिला मुंबईतील रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरची पत्नी आहे. धारावीत आतापर्यंत एकाचा मृत्यू झालेला आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिका तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या घेणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीचं महत्त्वाचं पाऊल आहे

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 857 वर गेली असून एकूण 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत काल 143 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.

(Dadar Hospital Nurses Dharavi Corona Patients)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *