दोन परिचारिकांना 'कोरोना', दादरचे शुश्रुषा रुग्णालय सील करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

दादरमधील 'शुश्रुषा' हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या सर्व रुग्णांना पुढील 48 तासांत डिस्चार्ज देण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. (Dadar Shushrusha Hospital to be sealed)

दोन परिचारिकांना 'कोरोना', दादरचे शुश्रुषा रुग्णालय सील करण्याचे मुंबई महापालिकेचे आदेश

मुंबई : दोन परिचारिकांना ‘कोरोना’ची लागण झाल्यामुळे मुंबईतील शुश्रुषा रुग्णालय महापालिका सील करण्याच्या तयारीत आहे. दादर पश्चिमेकडील या रुग्णालयात प्रवेश मनाई करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (Dadar Shushrusha Hospital to be sealed)

‘शुश्रुषा’मध्ये अॅडमिट असलेल्या सर्व रुग्णांना पुढील 48 तासांत डिस्चार्ज देऊन दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. तसंच नव्याने कुणालाही अॅडमिट न करण्यास सांगितले आहे. दोन नर्स कोरोनो पॉझिटिव्ह सापडल्याने सर्वच नर्सेसना रुग्णालयातच क्वारंटाईन करुन त्यांचीही चाचणी केली जाणार आहे. चाचणीचे अहवाल आल्यानंतर त्यांना इतरत्र हलवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

दादरमध्ये आजच्या दिवसात ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यात ‘शुश्रुषा’ हॉस्पिटलमधील दोन नर्स शिवाय 80 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. रुग्णालयातील 27 वर्षीय आणि 42 वर्षीय परिचारिकांचे कोरोना अहवाल काल पॉझिटिव्ह आले आहेत. आता दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे.

दरम्यान, माहिमचे हिंदुजा रुग्णालय सुरु असून खारचे हिंदुजा रुग्णालय बंद करण्यात आले आहे. माहीमचे पी. डी. हिंदुजा रुग्णालयातील ओपीडी सुरु असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. तर खारमधील हिंदुजा हेल्थकेअर हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. नामसाधर्म्य असल्याने अनेकांचा गोंधळ झाला होता. खारच्या हिंदुजा हेल्थकेअर हॉस्पिटलमधील 31 कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत.

दुसरीकडे, धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. कोरोनाचे पाच नवे रुग्ण आढळल्याने धारावीतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 22 वर पोहोचली आहे. त्यापैकीदोघे जण दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या तबलिगींची पोलिसांनी यादी काढली होती. त्यामुळे दोघेही आधीपासूनच क्वारंटाइन होते.

(Dadar Shushrusha Hospital to be sealed)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *