प्रिय मित्र मोदी, दिवाळीच्या शुभेच्छा : नेतन्याहू

नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त देशभर आंनदाचे वातावरण आहे. प्रत्येतजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. इस्राइलच्या पंतप्रधान बेजामीन नेतन्याहू यांनी देखील पंतप्रधान मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खास म्हणजे या शुभेच्छा हिंदीतून दिल्या आहेत. मात्र, मोदींनी याला इंग्रजीतून उत्तर दिलं आहे. बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी बॉर्डरवर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीमधून निघाले आहेत. याच दरम्यान, इस्राइलच्या …

प्रिय मित्र मोदी, दिवाळीच्या शुभेच्छा : नेतन्याहू

नवी दिल्ली : दिवाळीनिमित्त देशभर आंनदाचे वातावरण आहे. प्रत्येतजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. इस्राइलच्या पंतप्रधान बेजामीन नेतन्याहू यांनी देखील पंतप्रधान मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खास म्हणजे या शुभेच्छा हिंदीतून दिल्या आहेत. मात्र, मोदींनी याला इंग्रजीतून उत्तर दिलं आहे.

बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी बॉर्डरवर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीमधून निघाले आहेत. याच दरम्यान, इस्राइलच्या पंतप्रधान बेजामिन नेतन्याहू यांनी ट्वीटरद्वारे मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

“मी भारतीय जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा सण आहे.  त्यानिमित्त आपल्याला आरोग्यमय आयुष्य लाभो. तसेच शुभेच्छा देतांना मला खूप आनंद होत आहे. यावेळी नेतन्याहू यांनी मोदींना एक आवाहन केलं होतं, तुम्ही जिथं दिवाळी साजरी करत असाल, त्या शहराचं नाव सांगा.” असं ट्विट नेतन्याहू यांनी मोदींना केलं.


मोदींनी नेतन्याहू यांच्या ट्विटला उत्तर दिलं की, “बीवी, माझ्या मित्रा, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मानतो. प्रत्येक वर्षी मी बॉर्डरवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करतो. यंदा ही जवानांसोबतच दिवाळी साजरी करत आहे. हे फोटो उद्या शेअर करतो.”  अशा प्रकारचे ट्विट करत मोदींनी नेतन्याहू यांना शानदार उत्तर दिलं आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *