दिल्लीत प्रदूषणाने हाहा:कार, धुरक्यामुळे रस्ताही दिसेनासा

राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाने आता धोकादायक पातळी ओलांडली आहे. दिल्लीत काही ठिकाणी पाऊस झाला मात्र, त्याचाही या प्रदूषणावर काहीही परिणाम झालेला नाही(Air polluation). उलट पावसामुळे धुरकं आणखी वाढलं आहे.

दिल्लीत प्रदूषणाने हाहा:कार, धुरक्यामुळे रस्ताही दिसेनासा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाने आता धोकादायक पातळी ओलांडली आहे. दिल्लीत काही ठिकाणी पाऊस झाला मात्र, त्याचाही या प्रदूषणावर काहीही परिणाम झालेला नाही (Air polluation). उलट पावसामुळे धुरकं आणखी वाढलं आहे. सध्या दिल्लीमध्ये या धुरक्यामुळे दृष्यमानता कमी झाली आहे. या धुरक्यामुळे काही अंतरावरील वस्तू, इमारती, रस्तेही दिसेनासे झाले आहेत (Delhi Air polluation).

दिल्ली-NCR च्या(Delhi NCR)अनेक भागांमध्ये AQI म्हणजेच एअर क्वॉलिटी इंडेक्स लेव्हल 1000 च्या वर पोहोचली आहे. दिल्लीच्या आनंद विहार परिसरात AQI 1,683 वर पोहोचला. तर पटपडगंज परिसरात 999 AQI ची नोंद करण्यात आली. तसेच, सत्यवती कॉलेज परिसरात 961 AQI ची नोंद झाली.

दिल्ली-एनसीआरमध्ये पावसानंतरही लोक प्रदूषणाने ग्रस्त आहेत. दिल्ली आणि परिसरात शनिवारी सायंकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतरही दिल्लीत प्रदूषणाचा स्तर कमी झालेला नाही.

या परिस्थितीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत चिंता व्यक्त केली. ‘प्रदूषणाच्या असह्य स्तराने संपूर्ण भारताला चिंतेत टाकलं आहे. दिल्ली सरकराने अनेक प्रयत्न केले. दिल्लीच्या लोकांनी अनेक त्याग केले. त्यांची काहीही चूक नाही’, असं ट्वीट केजरीवाल यांनी कलं. तसेच, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

दिल्लीतील 32 फ्लाईट्स वळवली

दिल्ली-एनसीआरच्या प्रदूषणाचा हवाई वाहतुकीवरही मोठा परिणाम दिसून आला. दृष्यमानता कमी झाल्याने दिल्लीला येणाऱ्या तब्बल 32 विमानांना वळवण्यात आलं आहे. शनिवारी रात्री झालेल्या पावसानंतर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात धुरकं पसरलं. त्यामुळे रस्त्यावर तसेच, हवेतही लांबपर्यंत पाहणे अशक्य झाले आहे. एकीकडे धुरक्यामुळे वाहनांना लाईट्स सुरु ठेवून चालवावं लागलं, तर दुसरीकडे 32 फ्लाईट्स वळवण्यात आल्या.

दिल्लीनंतर नोएडामध्ये शाळा-कॉलेजांना सुट्टी

वाढत्या प्रदूषणाला पाहता दिल्लीनंतर आता नोएडा आणि ग्रेटर नोएडाचे शाळा-कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहेत. येथील सर्व शाळा-कॉलेज 5 नोव्हेंबरपर्यंत बंद राहाणार आहेत. खराब हवामानामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *