ऐन थंडीत दिल्लीचं राजकारण तापलं, निवडणुकीसाठी अमित शाहांपासून सर्वपक्षीय नेत्यांचा दारोदारी प्रचार

दिल्लीकरांची मनं कोण जिंकणार याचा खुलासा मात्र 11 फेब्रुवारीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पण, तुर्तास तरी सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावल्याचं चित्र (Delhi vidhansabha election campaign) आहे.

ऐन थंडीत दिल्लीचं राजकारण तापलं, निवडणुकीसाठी अमित शाहांपासून सर्वपक्षीय नेत्यांचा दारोदारी प्रचार

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला (Delhi vidhansabha election campaign) आहे. अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्यानं, ऐन थंडीत दिल्लीचं राजकारण तापल्याचं चित्रं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज (2 फेब्रुवारी) रविवारी सुट्टीच्या दिवशी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं.

ऐन थंडीत दिल्लीचं राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आप, भाजप नेत्यांनी दारोदारी प्रचार केला आहे. तर काँग्रेसच्या जाहीरनामांमध्ये विकासाची ग्वाही दिली आहे.

आम आदमी पक्ष, भाजप, काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी रविवारी जोरदार प्रचार केला आहे. भाजपनेही दिल्ली जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचं चित्रं दिसत आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी चक्क दारोदारी जाऊन प्रचार केला.

बुराडीतील बिहारी बहुल भागात अमित शाहांनी प्रचार सभा घेतली. ज्यात बिहारी नेत्यांसह भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, दिल्लीचे निवडणूक प्रमुख प्रकाश जावडेकर अशा अनेक नेत्यांनी भाषणं (Delhi vidhansabha election campaign) केली.

दुसरीकडे आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी किराडी, मुंडका, लक्ष्मीनगर, विश्वास नगर आणि रिठाला भागात रोड शो केला. यावेळी त्यांनी पुन्हा संधी देण्याचं आवाहन मतदारांना केलं.

तर आतापर्यंत बॅकफूटवर खेळणारी काँग्रेस देखील आता फ्रंटफूटवर येताना दिसत आहे. रविवारी काँग्रेसनं दिल्ली विधानसभेसाठी एक नव्हे तर दोन-दोन जाहीरनामे प्रसिद्ध केले. त्यातील एक जाहीरनामा हा विकासाची आश्वासनं देणारा तर दुसरा प्रदूषणानं पीडित दिल्लीला सोडवण्यासाठी पर्यावरण पूरक हरीत जाहीरनामा देण्यात आला आहे..

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पदवीधर तरुणांना 5 हजार प्रतिमहिना बेरोजगार भत्ता तर पदव्युत्तर बेरोजगारांना प्रतिमहिना 7500 रुपये बेरोजगार भत्ता देण्यात येईल असे नमूद करण्यात आलं  (Delhi vidhansabha election campaign) आहे.

तर दिल्लीकरांना 300 युनिट मोफत वीज, स्वस्त जेवणाकरिता 100 इंदिरा कॅन्टीन, कच्च्या घरांना पक्के करणार, नागरिकत्व सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान अशी अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत.

दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणारे आहे. त्यादृष्टीनं भाजप, आप, काँग्रेस हे तिन्ही पक्ष आपापल्या परीनं मतदारांना खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, यापैकी दिल्लीकरांची मनं कोण जिंकणार याचा खुलासा मात्र 11 फेब्रुवारीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पण, तुर्तास तरी सर्वच पक्ष प्रचारासाठी जोर लावल्याचं चित्र (Delhi vidhansabha election campaign) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *