टीका नाही, राज्य सरकारच्या कामाला समर्थन, हवं ते सहकार्य करायला तयार : देवेंद्र फडणवीस

सुरक्षित अंतर हाच कोरोना रोखण्यासाठी उत्तम उपाय आहे. घराबाहेर पडू नका," असे आवाहनही देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis Exclusive Interview) म्हणाले.

टीका नाही, राज्य सरकारच्या कामाला समर्थन, हवं ते सहकार्य करायला तयार : देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Devendra fadnavis Exclusive Interview)  आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारचे समर्थन केले. “राज्य सरकार जे काम करतंय त्याला समर्थन आहे. मात्र अजून खूप काम करणं आवश्यक आहे. अनेक आव्हाने आहेत, ती सोडवण्यासाठी राज्याला प्रयत्न करावे लागतील,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. टीव्ही 9 मराठीसोबत Exclusive मुलाखतीदरम्यान त्यांनी कोरोना बाबतच्या अनेक उपाययोजनांसह इतरही गोष्टींबाबत चर्चा केली.

राज्य सरकार जे काम करतंय त्याला (Devendra fadnavis Exclusive Interview)  समर्थन आहे. मात्र अजून खूप काम करणं आवश्यक आहे. अनेक आव्हाने आहेत, ती सोडवण्यासाठी राज्याला प्रयत्न करावे लागतील.  माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले, काही सूचना दिल्या त्या त्यांनी मान्य केल्या. इथे सत्तारुढ आणि विरोधक हा प्रश्न नाही, जी मदत लागेल ती आम्ही करु,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“ही टीका करण्याची वेळ नाही, सूचना देऊ, पण महाराष्ट्रात सैन्य बोलावण्याची वेळ नाही येईल असं वाटत नाही, लोकांना गांभीर्य नाही, अनेकांना वाटतं मला काय होणाराय? तर असा विचार करु नये,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“कोरोनाला घाबरुन न जाता त्याचा सामना करावा लागेल. केंद्राने उत्तम निर्णय घेतले. आर्थिक निर्णय चांगले घेतले आहेत. कोणीही उपाशी राहणार नाही याची तजवीज केंद्राने केली आहे,” असेही फडणवीसांनी सांगितले.

“केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लॉकडाऊनच्या काळात थोडं जगणं सुसय्य होईल. राज्य सरकारने आतापर्यंत जे निर्णय घेतले त्याला आमचं समर्थन आहे. मात्र राज्याने अजून निर्णय घेणे आवश्यक आहे. आम्ही टीका करणार नाही, सूचना देऊ,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

घराबाहेर पडू नका

“सुरक्षित अंतर हाच कोरोना रोखण्यासाठी उत्तम उपाय आहे. घराबाहेर पडू नका, समाजाला मदत करा,” असे आवाहनही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मी सध्या घरी आहे. कुटुंबासोबत वेळ घालवतो आहे. मुलीला वेळ देतो आहे. कुटुंबासोबत जेवण करतो आहे आणि थोडासा व्यायामही करतो,” असेही फडणवीस म्हणाले.

सरकारने मास्टर प्लॅन करावा

“स्थलांतरित कामगारांचा प्रश्न आवाचून उभा आहे. केंद्राशी बोलून योजना आखावी लागेल. त्यांच्या जेवणा-खाण्याची सोय करावी लागेल,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“सरकारने योग्य तो मास्टर प्लॅन तयार करावा. सरकारकडे तशी यंत्रणा असते, जेवढ्या जास्तीत जास्त सेवा घरपोच देता येतील. ज्या सेवा विकेंद्रीकरण करता येतील त्या कराव्या,” असा सल्लाही देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.

गरीबांच्या चाचण्या मोफत करा

“केंद्राकडून लॅबसाठी कोणताही विलंब नाही, कोरोना हा वेगळा विषाणू आहे, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या नीट चाचण्या होणे आवश्यक आहे, स्टॅण्डर्डायजेशन महत्त्वाचं आहे. तशा किट वापरणे हे WHO चे निर्देश आहे,” असेही देवेंद्र फडणवसींनी स्पष्ट केलं.

“अनेकजण केंद्र आणि राज्य असा भेद करत आहेत, मात्र सध्या हा भेद करण्याची वेळ नाही. आपण टीम म्हणून काम करायला हवं, त्यातील तांत्रिक बाजू समजून घ्यायला हव्या, केंद्राने किट पुरवल्या नाहीत हे म्हणणं अयोग्य आहे,” असे प्रत्युत्तरही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

“त्याशिवाय गरिबांच्या कोरोना चाचण्या मोफत करायला हव्यात. तर जे पैसे भरु शकतात त्यांना सबसिडी द्यायला हवी,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मजबूत

“21 दिवसांच्या लॉकडाऊननंतर सरकारला मोठे कष्ट घ्यावे लागतील. देशात सर्वात मजबूत अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. कर्ज वाढलं तरी चिंता न करता मदत करायला हवी. हे संकट टळल्यानंतर अर्थव्यवस्थेबाबत कार्यक्रम आखता येतील. रेपो दरात कपात झाल्याने व्याजदर कमी झाले आहे. बँकांतील लिक्विटिडी महत्त्वाची ठरणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. 2008-09 च्या जागतिक मंदीवेळी जी भारतीय अर्थव्यवस्था होती, त्यापेक्षा मजबूत आहे,” असेही देवेंद्र फडणवीसांना सांगितले.

“भाजपकडून महाराष्ट्रातील 20 लाख लोकांपर्यंत शिधा किंवा जेवण पोहोचवणार आहे. शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे, शेतमाल पडून आहे, द्राक्ष उत्पादक संकटात आहेत, शेतमाल वाहतूक काही ठिकाणी रोखली आहे, ती सुरु केली पाहिजे, दूध संकलन थांबलंय, शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“लोकांना आधी खात्री द्यायला हवी तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील, दुसरं म्हणजे पुरवठ्याची नवी व्यवस्था करावी लागेल, पुरवठ्याचं विकेंद्रीकरण करावं. सरकार किंवा स्वयंसेवी संस्थामध्ये समन्वय ठेवून, पुरवठ्याचं विकेंद्रीकरण करायला हवं,” असेही फडणवीस म्हणाले.

पोलिसांनी कोणाला मारु नका

“माझं पोलिसांना एवढाच संदेश आहे की लोकांनी रस्त्यावर येऊ नये यासाठी कर्फ्यू सदृश्य स्थिती आहे. मात्र तरीही काही लोक येत आहेत, माझी विनंती पोलिसांनी की कोणाला मारु नका, कारवाई करा, जनतेला हात जोडून विनंती घराबाहेर पडू नका,” असेही फडणवीस (Devendra fadnavis Exclusive Interview)  यावेळी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *