जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव, लालबागमध्ये कोरोनाचा रुग्ण

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा (Dharavi slum area Corona Positive Patient)  शिरकाव झाला आहे.

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचा शिरकाव, लालबागमध्ये कोरोनाचा रुग्ण

मुंबई : कोरोनाने गुणाकार सुरु केल्यानंतर त्याची व्याप्ती वाढताना (Dharavi slum area Corona Positive Patient) दिसत आहे. कारण जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. याशिवाय जगभरात ख्याती असलेल्या लालबाग परिसरातही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. धारावीत एका 56 वर्षीय पुरुषाला तर, लालबागमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याने, ती राहत असलेली लालबाग परिसरातील संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.

जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. धारावीत झोपडपट्टीत राहणाऱ्या 55 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच तो राहत असलेली इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. या व्यक्तीने कुठेही परदेशी प्रवास केलेला नाही. त्याच्या घरातील 8 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 335 वर पोहोचला (Dharavi slum area Corona Positive Patient)  आहे. आज (1 एप्रिल) दिवसभरात 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात 30 रुग्ण हे मुंबईतील असून दोन पुण्यातील आणि एक बुलडाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 335 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे मुंबईत पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

तर राज्यात कोरोनामुळे 6 मृत्यूंची नोंद झाली. मुंबईत आज दिवसभरात 5 मृत्यूंची नोंद झाली आहे. यात तीन महिलांचा समावेश आहे. तर पालघरमध्ये एका 50 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे या तिघांनी कुठेही परदेशी प्रवास केल्याचा इतिहास नाही. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 झाली आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 181
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  16
कल्याण – 10
नवी मुंबई – 8
अहमदनगर – 8
ठाणे – 8
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
बुलडाणा – 4
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 335

राज्यात आज एकूण 705 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 हजार 465 नमुन्यांपैकी 322 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 41 कोरोना बााधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात 24 हजार 818 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1 हजार 828 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
पालघर  – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई422163741368
पुणे (शहर+ग्रामीण)7706938338
पिंपरी चिंचवड मनपा4903410
ठाणे (शहर+ग्रामीण)
48273691
नवी मुंबई मनपा28788071
कल्याण डोंबिवली मनपा14049127
उल्हासनगर मनपा3786
भिवंडी निजामपूर मनपा176116
मिरा भाईंदर मनपा73215729
पालघर 15613
वसई विरार मनपा96610530
रायगड648526
पनवेल मनपा56125
नाशिक (शहर +ग्रामीण)450210
मालेगाव मनपा76258
अहमदनगर (शहर+ग्रामीण)141367
धुळे17316
जळगाव 760172
नंदूरबार 373
सोलापूर9344175
सातारा562322
कोल्हापूर 54324
सांगली124294
सिंधुदुर्ग5220
रत्नागिरी30425
औरंगाबाद15921468
जालना1301
हिंगोली 19110
परभणी711
लातूर 12583
उस्मानाबाद 8031
बीड471
नांदेड 1296
अकोला 6421431
अमरावती 24516
यवतमाळ 131221
बुलडाणा 7383
वाशिम 80
नागपूर6148411
वर्धा 901
भंडारा3200
गोंदिया 6610
चंद्रपूर2610
गडचिरोली3800
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)62015
एकूण72300313332465
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *