धोनी आता कबड्डीच्या मैदानात

मुंबई:  भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला टी-20 संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे टी-20 मैदानापासून दूर असलेला एम. एस. धोनी कबड्डीच्या मैदानावर उतरला आहे. याआधी धोनीला फूटबॉल मैदानावर आपण पहिलं होतं, मात्र आता धोनी कबड्डी मैदानात दिसणार आहे. बीसीसीआयने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-20 दौऱ्यासाठी धोनीला वगळलं आहे. त्यामुळे धोनी गेल्या …

धोनी आता कबड्डीच्या मैदानात

मुंबई:  भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला टी-20 संघात स्थान मिळालं नाही. त्यामुळे टी-20 मैदानापासून दूर असलेला एम. एस. धोनी कबड्डीच्या मैदानावर उतरला आहे. याआधी धोनीला फूटबॉल मैदानावर आपण पहिलं होतं, मात्र आता धोनी कबड्डी मैदानात दिसणार आहे.

बीसीसीआयने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-20 दौऱ्यासाठी धोनीला वगळलं आहे. त्यामुळे धोनी गेल्या काही दिवसांपासून टी-20 क्रिकेटपासून दूर आहे. सध्या तो जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी व्यस्त आहे.

अशाच एका जाहिरातीच्या चित्रकरणा दरम्यान धोनीला कबड्डी मैदानावर उतरला होता. यावेळी धोनी मैदानावर स्पर्धकांसोबत कबड्डी खेळतानाही दिसला.

तसेच, क्रिकेट आणि फूटबॉल हे खेळ धोनीच्या आवडीचे राहिले आहेत. क्रिकेटचं मैदान तर धोनीने आपल्या खेळीने गाजवलं आहे. मात्र आता धोनी कबड्डीच्या मैदानातही कसरत करताना दिसतोय.

रिती स्पोर्ट्स या एका व्यावसायिक जाहिरात कंपनीने कबड्डी मैदानावरील धोनीचा फोटो अपलोड केला होता. आता धोनीचा हाच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या : वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या धोनीचं टी ट्वेण्टी करिअर संपलं?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *